सकल धनगर समाजाचे नेतृत्व माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी करावे : परभणी येथे विभागीय बैठकीत सर्व संघटनाचा ठराव



नगर (प्रतिनिधी) :  राज्यात सध्या धनगर समाजाच्या आरक्षणाची ज्योत पेटली असून  राज्यातील विविध सामाजिक संघटना आरक्षणाच्या विषयावर मोर्चा, आंदोलन करत आहेत  मात्र गेल्या ६०वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला आजवर यश मिळाले नाही ही वस्तुस्थिती आहे. मागील  ५वर्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने १००० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून अनेक योजना सुरू केल्या होत्या. तत्कालीन सरकारच्या मंत्री मंडळातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नववे वंशज प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात आंदोलन सुरू केले तर  सरकारच्या धोरणांमधील बारकाव्याची माहिती असलेले अभ्यासू नेतृत्व लाभल्याने समाजाचा विकास होईल अशी भावना सुरेश भुमरे, विट्टल राबदडे, लहुजी शेवाळे,या समाजाच्या चळवळीत दोन दशकांपासून  सक्रिय असलेल्या नेत्यांची आहे.

 

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या माहेरच्या चौंडी येथील राजघराण्यातील थेट नववे  वारस प्रा राम शिंदे स्वतः सहभागी झाल्यावर राज्यात एक वेगळा संदेश जाणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज खासदार छत्रपतीउदयनराजे भोसले, छत्रपती शाहू महाराजांचे थेट वंशज छत्रपती  खासदार संभाजी राजे  सक्रिय झाल्यामुळे समाजात चैतन्य निर्माण झाले आहे. तसेचपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे वंशज धनगर समाजाचे नेते म्हणून उदयाला येणे काळाची गरज आहे. 

 

प्रा राम शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये तब्बल १४ खात्यांचे मंत्रिपद संभाळले असून  इतिहासात प्रथमच निर्माण झालेल्या ओबीसी मंत्री म्हणून काम पाहिले आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म गावी (चौंडी ता. जामखेड) येथे शासकीय पातळीवर जयंती उत्सव सुरू करून या जन्मगावी केंद्रीय मंत्री व राज्य मंत्री मंडळातील अनेक दिग्गज मंत्री निमंत्रित करून या भागात अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यामुुळे या सर्व जमेच्या बाबीं वर यावेेळी चर्चा झाली.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post