महाराष्ट्र धनगर कृती समितीची बैठक संपन्न : 1 ऑक्टोबरला निवेदन देण्याचे नियोजन

नगर,(प्रतिनिधी) : दि.25 सप्टेंबर 2020 रोजी माळशिरस येथे धनगर आरक्षण कृती समिती महाराष्ट्र राज्य पुणे, कार्यकारणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ होणे करिता दिशा ठरवणेसाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेनुसार आगामी काळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणा बरोबरच धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढील प्रमाणे  सर्व कार्यवाही तातडीने  करणेबाबत सर्वानुमते ठरले  आहे.

त्याप्रमाणे दि. 1 आक्टोंबर  रोजी तमाम महाराष्ट्रातील सर्व तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी खालील प्रमाणे शांततेने निवेदन देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. त्याचबरोबर येत्या कालावधीत राज्याचे प्रमुख नेते मा. शरदचंद्रजी पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व विरोधी पक्ष नेते  देवेंद्रजी फडणवीस यांची कृती समितीच्या नेत्यांनी वेळ घेऊन धनगर प्रश्न सोडवण्यासाठी आग्रह धरण्यात यावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले.   

बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय सुभाष पाटील खेमनर हे होते, सदर बैठकीसाठी परमेश्वर कोळेकर, डॉ मारुतीराव पाटील, बजरंग नाना खटके, दादासाहेब काळे, गणपतराव वाघमोडे, शिवाजीराव ईजुगडे, विठ्ठलनाना पाटील, शिवाजीराव पाटील,अँडवोकेट पांढरे, पांडुरंग तात्या वाघमोडे, विष्णु देशमुख ,बजरंग नाना गावडे, पंकज देवकते, अमोल खरात, किरण गोफणे, सोन्नर साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते.        

         
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -


निवेदन देताना खालील नमुन्यात निवेदन सादर करावे असे अवाहन करण्यात आले आहे.

प्रति मा, तहसीलदार साहेब,
----------------


विषय ः महाराष्ट्रातील धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवण्या बाबत.
 

महोदय,


वरील विषयानुसार धनगर समाजातील तमाम नागरिकांच्या वतीने आपणास विनंती करण्यात येते की  धनगर समाजाची आर्थिक,राजकीय,शैक्षणीक व सामाजिक परिस्थिती अत्यंत हालाखीची व बिकट झालेली आहे यामधून धनगर समाजाची उन्नती होणेसाठी यापूर्वीच महाराष्ट्राच्या यादीत  धनगर समाजाचा आदिवासी मध्ये समावेश आहे तथापि धनगर ऐवजी धनगड असा उल्लेख झाल्यामुळे समाजाला आरक्षणाचे फायदे मिळू शकत नाही ही दुरुस्ती होणेसाठी   महाराष्ट्च्या मुख्यमंत्री यांनी 1) महाराष्ट्राच्या आदिवासीच्या यादीमध्ये अनुक्रमांक 36 वर धनगड   ऐवजी धनगर अशी दुरुस्ती केंद्र शासनाने करणे बाबत ची शिफारस करण्यात यावी (2)केंद्र सरकारने या दुरुस्तीबाबत चे बिल तयार करून संसदेमध्ये मंजूर करण्यात यावे(3) किंवा संसदेत सादर झालेल्या  325  क्रमांकाच्या बीलामध्ये ही दुरुस्ती टाकून बिल मंजूर करावे (4)किंवा या  दुरुस्ती बाबतचा राष्ट्रपती यांचे मान्यतेने  अद्यादेश  त्वरित काढण्यात यावा अशी मागणी तमाम धनगर समाजाच्या वतीने करण्यात येत आहे कृपया हे निवेदन आपले शिफारशीसह माननीय मुख्यमंत्री यांना सादर करावे ही नम्र विनंती 

आपले नम्र
महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण कृती समिती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post