महानगरपालिका निवडणुकीत भाजपसाठी निशांत तारणहार


वेब टीम : अहमदनगर
अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने शहरातील 68 प्रभागाता स्वबळावर निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवले. मात्र एक असा उमेदवार होता ज्याच्याकडे पक्ष घरी गेला अन् म्हणाला तुला प्रभाग क्र.07 मधील सर्व साधारण जागेवर उमेदवारी करावी लागेल.

प्रभाग नवखा, कोणीही ओळखीचे नव्हते. पक्षाचे आस्तित्व नगन्य कार्यकर्ते व उमेदवारीच्या ओळखी करत-करत निवडणुकीत रंग आणण्यात अनं भारतीय जनता पार्टीने दाखविलेला विश्‍वास सार्थ केलेले नाव म्हणजे निशांत वसंत दातीर.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात वादाची थिणगी पडली अन् अहमदनगर महानगर पालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. सत्ताधारी पक्ष केंद्रात व राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची जादू नगर महानगर पालिकेत दिसणार म्हणून उमेदवारीसाठी अनेकांचे प्रयत्न सुरु होते. 68 पैकी 67 उामेदवारी निश्‍चित झाले. 01 जागेवर उामेदवारीसाठी कोणीही तयार होईल. कारण तेथे प्रचंड दहशत म्हणून एक जागा रिक्त ठेवावी लागेल का असा पक्षश्रेष्ठींचा विषय सुरुअसतांना कोअर कमिटीमधील एका नेत्याने या दहशतीवर एकच मात करु शकेल तो म्हणजे निशांत दातीर असा विश्‍वास व्यक्त केला अन् रात्री दीड वाजता त्याने उमेदवारी निश्‍चित केली. उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी अवघ्या काही तासातच सर्व सोपस्कार पार पाडत अर्ज दाखल केल्यानंतर बोल्हेगांव-नागपूर येथील प्रभाग 07 मधून निशांत दातीर यांनी अर्ज दाखल केला.

प्रथमत: अर्ज माघे घेण्यासाठी काही लोकांनी संपर्क केला मात्र प्रतिसाद मिळत नाही, म्हणून काहींनी आर्थिक प्रलोभन दाखविण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीत रंग भरू लागला तसतसं नेत्यांच्या सभा सुरू झाल्यानंतर निशांत दातीर यांचे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी असलेले संबंध दिसू लागले.तत्कालीन पालकमंत्री प्रा राम शिंदे, समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे, माजी केंद्रीय मंत्री दिलीपकुमार गांधी,जिल्हाध्यक्ष प्रा भानुदास बेरड या नेत्यांनी अक्षरशः प्रभाग पिंजून काढला. अवघ्या १५दिवसात कुणाचीही ओळख नसलेल्या उमेदवारानी प्रचाराचा धुरळा उठवल्यामुळे विरोधकांची पाया खालची वाळू सरकू लागली.भाजपनेही  ताकत लावली ज्या मतदारसंघात अस्तित्व टिकवणे अवघड होते त्या ठिकाणी जाऊन निशांत दातीर यांनी नियोजन बद्द सुरू केलेला प्रचार  पाहून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भागासाठी विशेष पॅकेज जाहीर केले. शिवसेना,राष्ट्रवादी अशी लढाई वाटणाऱ्या या भागात भारतीय जनता पक्षाने तुल्यबळ लढत दिली ती केवळ निशांत दातीर यांच्या उमेदवार म्हणून होते म्हणून असे म्हटलं तरी वेगळं वाटणार नाही.आज जरी निशांत दातीर यांचा महानगरपालिका निवडणुकीत पराभव झाला आहे हे वास्तव आहे  मात्र उद्या नक्कीच त्यांना भविष्य आहे हे ही तितकेच खरे आहे.
संदीप क्षीरसागर, प्रभाग क्रमांक ०७ चे भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रचार प्रमुख

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post