श्रीमंत बालाजी गणेश मंडळाचे धार्मिक, सामाजिक कार्य कौतुकास्पद - अॅड.धनंजय जाधव
नगर - श्रीमंत बालाजी गणेश मंदिरम्च्या 14 वा वर्धापनदिन उत्सवानिमित्ताने पंचरंग युवक मंडळाने विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम राबवुन साजरा करण्यात आला. मुख्य दिवशी 5 मार्च रोजी गणेश पुजन, होमहवन, अभिषेक, महाआरती आणि महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम झाले. यावेळी पंचरंग गल्ली भागातील जेष्ठ नागरीकांच्या हस्ते भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त यावेळी उपस्थित राहुन महाप्रसादाचा व विविध कार्यक्रमांचा लाभ घेतला.
या वर्धापन दिनानिमित्त 4 ते मार्च 5 मार्च 2025 दरम्यान पंचरंग युवक मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये नुकताच प्रसिद्ध झालेला चित्रपट छावा मोठ्या एलईडी स्क्रिन वर दाखवण्यात आला. तसेच हनुमान चालिसा पठाण कार्यक्रम घेवुन हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक धनंजय जाधव म्हणाले कि, मंडळाच्या माध्यमतून वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात. यामध्ये सामुदायिक तुलसी विवाह, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप, नवरात्र उत्सवामध्ये महिलांसाठी सामुहिक दुर्गापाठ, गणोत्सवामध्ये तरुण आणि लहान मुलांच्या कलागुणाना वाव मिळण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात. तसेच या उत्सवांच्या माध्यमातून गरजू नागरीकांसाठी विविध शिबीरांच्या माध्यमतून मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात करतात. त्यांचे धार्मिक आणि सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगिलते.
त्यां प्रसंगी प्रमुख उपस्थिती तोफखाना पोलीस स्टेशन चे एपीआय मंगेश गोंटला, नगरसेवक धनंजय भैय्या जाधव, माजी नगरसेवक अजयचितळे, पद्मशाली पंच कमिटीचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, श्री मार्कंडेय देवस्थानचे अध्यक्ष गणेश विद्ये, मा.नगरसेवक प्रकाशभाऊ भागानगरे, विष्णू कलागते, पो.राहुल गुंडू, पो.अभिजीत अरकल, दिनेश सुळ, सुरज जाधव, अक्षय डाके, सागर मुर्तुडकर, धिरजशेठ पोखरणा, लंकेश हरबा, यांचा श्री योगेश मिसाळ श्री बाळासाहेब आगळे भाजपा चे सौ श्वेताताई झोंड सत्कार मंदीराचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र भाऊ बोगा यांचा हस्ते करण्यात आला.
वर्धापन दिन सोहळा यशस्वीतेसाठी अनिल बोगा, शंकर दंडी, चंद्रकांत दंडी, देविदास चिलका, शाम बोगा, सतिष चिलका, सागर गोंधळे, हर्षद आडेप ,संजय बोगा,सागर दंडी,अमोल दंडी, महेश रोल्ला,संतोष बोगा,गौरव चिलका नरेश कोडम,प्रणव बोगा,शौनक बल्लाळ, आदित्य बोगा,संतोष आडेप,लखन कोटा,चंद्रकांत अल्ली सर,व्यंकटेश दंडी,यंशवंत दंडी,जंयत बोगा,आंनद दंडी,पुरूषोत्तम बोगा,राकेश बोगा,चेतन दंडी,देवाक बोगा,अक्षय दंडी,ओम बोगा,रुद्राक बोगा,सिध्दू गोंधळे,निहाल बोगा,अर्थव कुंचन,गोरख बोगा,ओमकार बोगा,अथर्व येमुल,अभय रंगा, मुरली बिल्ला,निशांत गुरुड,साई बोगा,सोहम दंडी अमन बोगा,अनुज बोगा युवराज बोगा, सार्थक गोंधळे भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष विनोद बोगा आदींसह परिसरातील महिलांनी विशेष परिश्रम घेतले. हा उत्सव यशस्वी साजरा करण्यासाठी सर्व मंडळाचे हितचिंतक व वर्गणी दार यांच्या सहकार्याने सर्व शक्य झाले असे मंडळाचे सदस्य सागर गोंधळे यांनी सांगितले
.jpg)
Post a Comment