राज्यस्तरीय आहिल्यादेवी होळकर पुरस्काराने ज्योती सोमनाथ भिटे सन्मानीत

 
    राज्यस्तरीय आहिल्यादेवी होळकर पुरस्काराने ज्योती सोमनाथ भिटे सन्मानीत
"  ज्योती सोमनाथ भिटे "आजच्या आहिल्या"- संजीवनी तोडकर नैसर्गिक उपचार तज्ञ

राज्यस्तरीय आहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण सोहळा आज दिनांक 31 मे 2024 रोजी अहमदनगर शहरातील सावेडी येथील माऊली सभागृह या ठिकाणी संपन्न झाला कर्तृत्ववान महिलाना डॉ.कावेरी कैदके  यांनी आहिल्या  फाऊंडेशद्वारे  संजीवनी तोडकर निसर्गोपचार तज्ञ यांच्या हस्ते व अलका कोविंद यांच्या उपस्थितीत  सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक, राजकीय व वैदयकीय क्षेत्रात उल्लेखनीय काजकाज करणाऱ्या महिलांना नुकताच सन्मानित करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्हयातील ज्योती सोमनाथ भिटे यांना "आजच्या आहिल्या" हया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.* ज्योती सोमनाथ भिटे यांनी उद्योजिका  या क्षेत्रात उल्लेखनीय कामकाज केले आहे. त्यांनी आपल्या संसाराचा गाडा सांभाळून गो फार्म, पी.के.एल फार्मच्या माध्यमातून  दुग्धजन्य पदार्थ, फार्म फ्रेश बाय-नेचर, 100% नॅचरल प्रॉडक्ट तसेच अथर्व ड्रेपरी च्या माध्यमातून ड्रेस डिझायनर आहेत त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.  त्यामुळे  वांबोरी ता.राहुरी येथील  अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय बाबासाहेब भिटे व वांबोरी ग्रामपंचायतींचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी ज्योती भिटे यांचे  अभिनंदन केले आहे ज्योती भिटे या अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्या भाऊजई व वांबोरी तालुका राहुरी गावच्या उपसरपंच सौ.मंदाताई बाबासाहेब भिटे यांच्या जाऊबाई आहेत. तसेच जिल्हा परिषद जलजीवन व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी सोमनाथ भिटे यांच्या त्या पत्नी आहेत.    

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post