पोस्टल संघटनेच्या कार्याध्यक्षपदी अहमदनगरचे संतोष यादव तर सचिवपदी, संतोष कदम

 निवड:पोस्टल संघटनेचे राज्य अधिवेशन बुलढाणा येथे संपन्न



अहमदनगर: नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल असोसिएशन ग्रुप सी महाराष्ट्र 26 वे  द्विवार्षिक अधिवेशन अर्बन रेसिडेन्सी हॉल मध्ये संपन्न झाले. त्यामध्ये अहमदनगर विभागाचे पोस्टल संघटनेचे जेष्ठ नेते संतोष यादव यांची कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या अधिवेशनाचे उदघाटन  सुनिलजी झुंझारराव राष्ट्रीय अध्यक्ष  नवी दिल्ली तर  शिवाजी वासू रेड्डी सेक्रेटरी जनरल नवी दिल्ली निसार मुजावर जनरल सेक्रेटरी नवी दिल्ली यांचे शुभहस्ते झाले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून  गणेश अंभोरे प्रवर अधिक्षक डाकघर बुलढाणा , टी एन राहाटे,पी टी असलकर हे होते.
या अधिवेशनात कर्मचाऱ्याना दैनंदिन कामकाजात येत असलेल्या विविध समस्येविषयी सविस्तरपणे चर्चा झाली.  प्रतिनिधी सत्रात महाराष्ट्र व गोवा राज्यातील चाळीस विभागातील प्रतिनिधी सहभाग घेत आपल्या विभागातील विविध प्रश्न उपस्थित केले.
या प्रश्नावर राष्ट्रीय नेते सुनील झुंझारराव,श्री शिवाजी वासू रेड्डी,निसार मुजावर ,यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन करत येणाऱ्या कालखंडात त्यावर निश्चितच तोडगा काढण्यासाठी संघटना प्रयत्नशील असेल.
या सर्वांच्या उपस्थितीत 
संघटनेची पुढील दोन वर्षासाठी पुढील प्रमाणे कार्यकारणी निवडण्यात आली 
 अध्यक्ष रामभजन गुप्ता (मुंबई)कार्याध्यक्ष संतोष यादव (अहमदनगर)  शिवाजी नवले (बीड)मंडळ सचिव संतोष कदम (ठाणे),धनंजय राऊत (नागपूर) उपमंडळ सचिव, सहायक मंडळ सचिव  काळूराम पारखी (पुणे), संजय सनातन (औरंगाबाद),नंदू झलबा (गोवा) शिवाजी तोंडले (पंढरपूर) आर एच अभंग (मुंबई) जे आर पाटील (बुलढाणा) योगेश समडोळीकर (कोल्हापूर),खजिनदारपदी  महादेव गोपाळघरे (मुंबई), सहायक खजिनदर विनोद जाधव, संघटन सचिव जी बी लोटे (नागपूर ग्रामीण) ऑडिटरपदी धनंजय  इंगोले (नवी मुंबई) यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
महिला कमेटीमध्ये विजया शहाणे (श्रीरामपूर)विनिता कुलकर्णी (ठाणे)उषा गोले (मुंबई) निता किनारे (छ संभाजीनगर) विद्या वाघ (कोल्हापूर)यांची निवड करण्यात आली.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा  बुलढाणा शाखेच्या वतीने  मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी राज्यभरातील विविध विभागातील एकशेसाठ प्रतिनिधी यांनी सहभागी झाले होते.
या अधिवेशनाचे प्रमूख संयोजक बुलढाणा विभागातील जिंतेंद्र पाटील,ज्ञानेश्वर मोतेकर,गजानन घुगे,रवींद्र झिने,रामेश्वर सोळंकी,गणेश जुबड,पंजाब पवार,प्रमोद रिंढे, सचिन गाराडे,अमोल दहातोंडे, मनोज जाधव यांचेसह त्याचे  सहकारी यांनी विशेष योगदान दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद कचरे तर आभारप्रदर्शन शरद खेडेकर यांनी केले.

--------------------------------------
फोटो कॅपशन:

नवनिर्वाचित राज्य कार्याध्यक्ष  संतोष यादव व मंडळ सचिव संतोष कदम, आर एच गुप्ता  यांचा सत्कार करताना संदीप कोकाटे,राजेंद्र विश्वास,कमलेश मिरगणे, प्रकाश कदम, रावसाहेब चौधरी,गोरक्ष कांबळे, शिवाजी चाफे,रावसाहेब खरात

--------------------------------


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post