नगर शहर जिल्हा भाजपाच्यावतीने बुथ चलो..घर चलो.अभियानास प्रारंभ

 


शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे

- प्रा.मधुसूदन मुळे

     नगर - गेल्या 10 वर्षात भाजपप्रणित केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनमान उंचविण्यासाठी विविध लाभदायी योजना सुरु केला. त्या योजनांचा लाभ संबंधितांना मिळून अनेक कुटूंब सुखी झाले आहेत. केंद्राची अन्न योजना, जन-धन खाते, उज्वला गॅस योजना, आयुष्यमान भारत योजना, शेतकर्‍यांसाठी किसान योजना, कौशल योजना, मुद्रा योजना, स्टार्टअप अशा विविध योजनांमुळे प्रत्येक घटकांचा विचार करुन सुरु करण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे काम भाजपा कार्यकर्त्यांनी करावे. गेल्या 10 वर्षांत देशाची होत असलेली प्रगती ही नेत्रदिपक अशीच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने जागतिक पातळीवरील भारत देशाचा दबदबा निर्माण झाला असून, त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रा.मधुसूदन मुळे यांनी केले.

     नगर शहर जिल्हा भाजपाच्यावतीने बुथ चलो... घर चलो.. अभियानाची सुरुवात माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या निवासस्थानापासून भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रा.मधुसूदन मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, लोकसभा निवडणूक प्रमुख बाबासाहेब वाकळे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, किशोर वाकळे, सचिन पारखी, प्रशांत मुथा, गोकूळ काळे, कैलास गर्जे, संजय ढोणे, प्रिया जानवे, अ‍ॅड.विवेक नाईक, रविंद्र बारस्कर, पल्लवी जाधव, मनोज ताठे, पंडित वाघमारे, बंटी ढापसे, लक्ष्मीकांत तिवारी, अजय चितळे, बाळासाहेब गायकवाड, अनिल निकम, उमेश साठे, नितीन शेलार, वंदना पंडित, स्वप्नील बेद्रे, सुरेखा जंगम, ज्योती दांडगे, मयुर बोचुघोळ, नितीन शेलार, शाकिर सय्यद, सागर शिंदे, सनी शिरसाठ, सतीश शिंदे, कालिंदी केसकर, राजू मंगलाराप, पियुष जग्गी, साहिल शेख, विकास घोरपडे, श्वेता पंधाडे, सुहास पाथरकर, शशिकांत पालवे, पुष्कर कुलकर्णी, गणेश भगत, सचिन काळे, चंद्रक़ांत भिंगारदिवे, जीवन सोनवणे, अमोल वाकळे, विजय वाकळे, अरविंद वाकळे, रियाज कुरेशी, हाजी अन्वर खान, रोहन ढवण, निशांत दातीर आदिंसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

     याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्यातील भाजपा प्रणित सरकारच्या योजनांतून सर्वांची प्रगती साधली जात आहे. या योजना संबंधितांपर्यंत पोहचविण्यासाठी पक्षाच्यावतीने घरोघरो जाऊन त्यांची माहिती संबंधितांना द्यावी. तसेच ज्यांना या योजनांचा लाभ झाला आहे, त्यांच्या प्रतिक्रिया सर्वांपर्यंत पोहचवाव्यात. केंद्र व राज्य सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाबरोबरच भाजपा कार्यकर्त्यांनीही पुढाकार घ्यावा. आज शुभारंभ होत असलेल्या बुथ चलो, घर चलो.. अभियानांतंर्गत बुथ स्तरावरील पदाधिकार्‍यांनी आपआपल्या भागातील प्रत्येक घरा..घरात जाऊन केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती देण्याबरोबर पक्षाचे ध्येय-धोरणे पोहचविण्याचे काम करावे.

     याप्रसंगी बाबासाहेब वाकळे, वसंत लोढा, प्रिया जानवे आदिंनी मनोगत व्यक्त केले यावेळी सचिन पारखी यांनी बुथ चलो.. घर चलो... अभियानाची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रशांत मुथा यांनी केले तर आभार रविंद्र बारस्कर यांनी मानले.

------

     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post