अनाथ, निराधार मुलामुलीच्या हस्ते झेंडावंदन

 भारतीय प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सर्वत्र सर्वदूर मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. देशभर विविध कार्यक्रमानं आपण तो साजरा करत आहोत. एक लोकशाही, सार्वभौम, प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जगभर भारताला ओळखले जाते. हा आनंदाचा उत्सव सर्वत्र साजरा होताना एक अत्यंत अभिनव, स्तुत्य  आणि विशेष अभिनंदनीय उपक्रम अनुभवायला मिळालाय.  तो म्हणजे अहमदनगर औद्योगिक वसाहतीमध्ये आठरे पाटील बालगृह आहे. त्या बालगृहामध्ये अनाथ निराधार मुलांचे संगोपन, शिक्षण, निवास आणि भोजन याची व्यवस्था केलेली आहे. अशा अनाथ निराधार मुलांसमवेत आपला राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनाचा सण आपण साजरा केला पाहिजे. त्या मुलांच्या समवेत हा आनंद उत्सव आपण साजरा करण्याची पद्धत सुरू झाली. चाकण ऑइल मिलचा परिवार आदरणीय श्री सुभाष शेठ लुंकड , आदरणीय श्री धीरजशेठ लउंकड, सौ लताजी लुंकड आणि श्री संजय प्रभाकर देशमुख , संजीवनी संजय देशमुख आणि मित्रपरिवार यांच्या मदतीने गेल्या पंधरा वर्षापासून चाकण ऑइल मिल परिवार आणि देशमुख परिवार भारताचा स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन चाकण ऑइल मिल मध्ये आठरे बालगृह आणि स्नेहालय मधील मुला मुलींच्या समवेत साजरा करत आहेत. यंदा आठरे बालगृहातील मुला मुली समवेत चाकण ऑइल मिल येथे झेंडा वंदन.  एक मुलगा आणि एक मुलगी यांच्या हस्ते  प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. खरं तर ही  अफलातून संकल्पना त्यावेळी सौ.प्रभावती प्रभाकर देशमुख यांची होती.  या मुला मुलींच्या हस्ते झेंडावंदन झालं पाहिजे. हा किती मोठा विचार आहे!. दुसऱ्याला आनंद,सुख मोठेपणा देण्याचा विचार आहे.त्यासाठी खास व्हिजन असणारी, खूप मोठी दूरदृष्टी आणि विचारशील, विनयशीलता असणारी ही मोठी माणसाचं हा परिपक्व विचार करु शकतात.विचारातील किती मोठी कल्पना आहे. ज्या मुलांना पालक नाहीत. ते निराधार आहेत. अशा मुलांच्या हस्ते झेंडावंदन करणे ही एक अफलातून असामान्य कल्पना त्यावेळी सौ. प्रभावती प्रभाकर देशमुख यांना सुचली. खरं तर या कल्पनेला सलाम करायला हवा. पुढे तोच वारसा आदरणीय श्री संजयजी प्रभाकर देशमुख यांनी आपल्या आईचा हा वारसा अविरतपणे आजही सुरू ठेवला आहे. खरंतर संजय प्रभाकर देशमुख हा मुलगा वेगळा माणूस प्रचंड गडगडाटी हास्य सदा सकारात्मक विचारधारा बाळगणारा हा हा अवलिया. प्रत्येक घटनेकडे सकारात्मक दृष्टीने पाहणारा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतः ते अभियांत्रिकीचं उच्च शिक्षण घेतलेले. सदा यंत्रामध्ये रमणारा.तरी सुध्दा माणूसपण जपणारा हा माणूस किती संवेदनशील आहे याची जाणीव झाली.यावेळी चाकण ऑइल मिल मध्ये झेंडावंदन झाल्यानंतर स्वर्गीय प्रभावती प्रभाकर देशमुख वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत आठरे पाटील बालगृहातील नऊ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. ग्रामीण भागातील मुलांना सभाधिटपणा यावा. त्यांनी आपले विचार अत्यंत मुद्देसूद पद्धतीने मांडावेत. त्यांच्यामध्ये आपले विचार मांडण्याचे कौशल्य आत्मसात व्हावे. या उद्देशाने ही स्पर्धा त्यावेळी प्रभावती प्रभाकर देशमुख या सावित्रीच्या लेकीने सुरू केलेली होती. पुढे त्यांचे चिरंजीव म्हणजे आदरणीय श्री संजय  प्रभाकर देशमुख यांनी औद्योगिक वसाहतीमध्ये आपलं मशनरी युनिट सुरू केल्यानंतर येथे ही स्पर्धा सुरू केली. आज चाकण ऑइल मिलमध्ये वक्तृत्व स्पर्धेचा परीक्षक म्हणून उपस्थित राहण्याचे परम भाग्य मला लाभलं.त्यानंतर विविध स्वरूपाचे वैयक्तिक  खेळाच्या स्पर्धा येथे पार पडल्या. तसेच सामूहिक गीत गायन झाले.देशभक्तीपर गीत गायनाने अंगावर रोमांच उभे राहिले.  त्यानंतर मुलांना खाऊ वाटप झाले. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक देण्यात आली, आदरणीय श्री संदेश घाडगे पाटील यांनी या मुला मुलींसाठी बुद्धिबळाचे नऊ संच विजेत्यांना पारितोषिक म्हणून दिले. आणि आठरे पाटील बालगृहासाठी आर्थिक मदत चाकण ऑइल मिलचे लुंकड परिवार आणि देशमुख परिवार यांनी दिली. खरोखरचं सतपात्री दान देण्याची ही पद्धत विशेष भावली. आज समाजामध्ये दातृत्व हा गुण दुर्मिळ होताना दिसतो आहे. अशा परिस्थितीमध्ये लुंकड परिवार आणि देशमुख परिवार करत असलेले हे अभिनव स्वरूपाचे कार्य समाजाला मोठं प्रेरणादायी वाटते. हा सर्व अनुभव घेतला त्यामुळे मला मोठी धन्यता वाटली. मनामध्ये चाकण ऑइल मिलचे लोणकर परिवार आणि देशमुख परिवार यांच्या विषयीचा आदर शेतपटीने वाढला. आणि स्वर्गीय चंद्रभान बाळाजी आठवले पाटील यांच्या मोठ्या कामगिरीला या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उजाळा मिळाला. स्व.खा.चंद्रभान बाळाजी आठरे पाटील असामान्य आणि अफाट कर्तृत्व असणारा साधा माणूस. ते समाजभान जपण्याचा  वारसा त्याच्यां घराण्यानं जपलाय.त्यातूनच आठरे पाटील बालगृहातील स्थापना झाली. अनाथ, निराधार मुला,मुलींची संगोपन, शिक्षण हे बालगृह मनापासून करतं. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अनाथ मुला मुलींच्या असते झेंडावंदन पाहून मला मनस्वी आनंद झाला त्यानंतर या बालगृहातील मुलांनी ज्या विविध स्पर्धेसाठी मोठा उत्साह दाखवला प्रत्येक स्पर्धेमध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला स्पर्धेसाठी स्वतःहून भाग घेतला त्यांच्यातली ही उत्साह शक्ती पाहून मोठा आनंद वाटला या मुलांच्या पाठीवर ही शब्बासकीची थाप ज्यावेळी देशमुख परिवार आणि लुंकड परिवार यांनी टाकली त्यावेळी अंगावर रोमांच निर्माण झाले. असेही दुसऱ्यासाठी जगता आलं पाहिजे हा विचार मनामध्ये आला. त्यावेळी विजेत्या स्पर्धकांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जात होता. आपण अनाथ नाही. आपण निराधार नाही. मोठ्या मनाची, उदार मनाची ही अशी माणसं आपल्या पाठीशी आहेत असं बरंच काही त्यांच्या चेहऱ्यावरील भाव सांगत होते. या बालगृहातील मुले आणि मुली मोठ्या आत्मविश्वासाने आपले विचार बेडरपणे मांडत होते. तसेच खेळामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून खेळत होते. हे सर्व खूप काही सांगून जात होते. लिंबू चमचा, बेडुक उड्या,गीत गायन,इतर विविध खेळ स्पर्धेचं परिक्षण सौ. संगनी अशोक घायळ आणि सौ. संजीवनी संजय देशमुख यांनी यशस्वीपणे केले. हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने श्री संजय प्रभाकर देशमुख, सावित्रीची सक्षम लेक सौ. संजीवनी संजय देशमुख, श्री सुभाष शेठ लुंकड श्री धीरज सेठ लुंकड,सौ. लताजी सुभाष लुंकड , या कार्यक्रमासाठी पुण्याहून खास उपस्थित असणाऱ्या आणि  देशमुख परिवारच्या स्नेही सौ. संगनी अशोक घायळ मॅडम, तसेच श्री अशोक घायळ साहेब, श्री संदेश घाडगे साहेब, श्री ख्रिस्ती साहेब, श्री नांगरे साहेब आणि  मित्रपरिवार आठरे बालगृहाच्या आदरणीय थोरात मॅडम यांनी मुलांना विविध स्पर्धेमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवण्यासाठी प्रोत्साहित केले. या सर्वांनी मोठे योगदान दिलं त्यामुळे हा सुंदर, अभिनव कार्यक्रम यशस्वी झाला.
 *प्रा. डॉ नवनाथ काशिनाथ वाव्हळ,९८८१८२७८३४.*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post