नगर-मदार या चित्रपटाची १२ ते १८ जानेवारी २०२४ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे होणाऱ्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हलसाठी मराठी कॉम्पिटिशन या विभागात निवड झाली आहे. अहमदनगर येथील मास कम्युनिकेशन या विभागाचे माजी विद्यार्थी मंगेश महादेव बदर यांनी मदार या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे.तर चित्रपटाचे निर्माते अभिनेते मिलिंद शिंदे,मंगेश बदर,मच्छिंद्र धुमाळ आहेत
या चित्रपटामध्ये अमृता अग्रवाल,आदिनाथ जाधव,मिलिंद शिंदे,अनुजा कांबळे,अजिनाथ केवढे,भागाबाई दुधे व इतर कलाकार आहेतमिलिंद शिंदे हे सोडले तर इतर सर्व कलाकार हे नवखे आहेत. मदार हा चित्रपट दुष्काळ भागातील जीवनशैलीवर आधारित आहे. मंगेश बदर यांनी या चित्रपटांमध्ये दुष्काळामधील गावातील माणसांचे आणि प्राण्यांचे जीवन चित्रित केले असून पाण्याअभावी होणारे हाल दाखवले आहेत.या चित्रपटासाठी रोहित नागभिडे यांनी संगीत दिले आहे.रोहित नागभिडे यांच्या व्यतिरिक्त मदार मधील टेक्निकल टीम आणि कलाकार हेदेखील नवखेच आहेत.
मदार हा ९२ मिनिटांचा चित्रपट असून मोठ्या पडद्यावरील उत्कृष्ट कलाकृती आहे,महाराष्ट्र सरकारकडून 'कान्स' चित्रपट महोत्सवासाठी झाली होती तसेच महाराष्ट्र शासन,एमटीडीसी व पुणे फिल्म फाऊंडेशन आयोजित पुणेआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मध्ये मदारचा सहभाग होता व पाच पुरस्कारांचा मानकरी ठरला लवकरच सर्व सिनेमागृहात रिलीज होणार आहे
मदार चित्रपटातील सर्व कलाकार व्यावसायिक कलावंत नसून ते दुष्काळी भागातील सर्व सामान्य लोक आहेत. चित्रपटात अभिनय करण्यासाठी त्यांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले.त्यानंतर चित्रिकरण करण्यात आले या कलाकारांमुळे चित्रपटात जिवंतपणा आला.हे कलावंत ज्या दुष्काळी भागातील हे लोक आहेत,त्याच दुष्काळी भागात चित्रपटाचे लोकेशन निवडले गेले आहे.असे मंगेश बदर यांनी सांगितले
मदार चित्रपटाचा सारांश असा आहे कि दुष्काळामुळे ग्रामीण भागातील लोकांचे जीवन कसे जळते, उन्हाळ्यात पाल तापल्यासारखी नाती तप्त होतात. मातीत ओलावा असेल तर माणसातही गोडवा असतो. सलग दोन वर्षे पाऊस न पडल्याने गावातील लोक जगण्याचा मार्ग शोधत आहेत, मात्र तो मार्ग कायमस्वरूपी नसल्याने लोक शहराकडे जाऊ लागले. ते नदीच्या काठावर राहू लागतात. गावातील लोकांचे जीवनमान हे शेतीवर अवलंबून आहे आणि शेती पूर्णपणे पाण्यावर अवलंबून आहे आणि कोरडवाहू शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. पाणी हे जीवन आहे तसेच पाणी नसेल तर जीवन अशक्य आहे. दुष्काळात अशा परिस्थितीत लोकांना धीर देण्याचे काम गावातील प्राध्यापक करत आहेत. आणि तो जमेल तितकी मदत करतो. बायकोचं दुःख आणि गावाचं दु:ख या दोहोंमध्ये प्राध्यापक स्वत:ला सावरतो आणि गावाला सावरतो. मदार चित्रपटाने हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला
Post a Comment