नगर- दातरंगे मळा येथील श्री दत्त कॉलनीत श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त श्री सुर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठान (ट्रस्ट) भजन संध्या (हरिहरेश्वर भजनी मंडळ)च्या वतीने धार्मिक, सांस्कृतिक, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानचे हे 21 वे वर्षे असून दर वर्षी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो. तसेच विविध कार्यक्रमांनी या उत्सवाची शोभा वाढते. तसेच या श्री दत्त जयंती निमित्त प्रतिष्ठानच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा करण्यात येतो. यामध्ये दरवर्षी 3-4 जोडप्यांचा विवाह लावण्यात येतात, तसेच उत्सवानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येतो त्यामध्ये 100 युवक दरवर्षी रक्तदान करतात. या जयंती उत्सवास हजारो लोक दर्शनासाठी गर्दी करुन महाप्रसादाचा लाभ घेतात. श्री सुर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठानच्या सर्व सदस्य व कार्यकर्ते यासाठी विशेष परिश्रम घेतात.
श्री दत्त जन्मोत्सव मंगळवार दि. 26 डिसेंबर 2023 रोजी असून त्यानिमित्ताने बुधवार दि.20 डिसेंबर रोजी भजन संध्या (हरिहरेश्वर भजनी मंडळ) सायं.7 ते रात्री 9 वा., गुरुवार दि.21 रोजी हास्य जत्रा सायं.7 ते रा.10 वा. शुक्रवार दि.22 रोजी आर.जे.प्रसन्न मनोरंजन कार्यक्रम सायं.7 ते रात्री 9 वा., शनिवार दि.23 रोजी श्री.राजाभाऊ कोठारी यांच्या शुभहस्ते गरजु विद्यार्थ्यांना नवीन सायकल वाटप व डान्स प्रोग्रोम (आकाश डान्स स्टुडिओ) सायं.7ते रा.10 वा., रविवार दि. 24 रोजी रक्तदान शिबीर स.9 ते दु.3 पर्यंत तसेच डान्स प्रोग्राम (सावरा गु्रप प्रस्तुत डान्स प्रोग्राम) सायं.7 ते रात्री 10 वा., सोमवार दि.25 रोजी जादुचे प्रयोग सायं.7 ते रात्री 10 वा., श्री दत्त जयंतीदिनी बुधवार दि.26 डिसेंबर 2023 रोजी स.7 ते 9 महारुद्राभिषेक, स.9 ते दु. 12 वा श्री दत्त पादुका पालखी सोहळा, स.10 ते स.11.30 वा. होमहवन, दु.12.50 वा.महाआरती, दु.1 ते दु.2 वा. सत्यनारायण महापुजा, दु.1 वा. सामुदायिक विवाह सोहळा, दु.1 ते दु.5 महाप्रसाद (भंडारा), सायं.7 ते रा.10 वा. श्री दत्त महाराजांना 56 भोग नवैद्य प्रसाद, महिलांचा मंगळागौर असे कार्यक्रम होतील. तरी जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सुर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी केले आहे.
Post a Comment