अहमदनगर: ऐतिहासिक भातोडी येथे नुकताच वीर शरीफजीराजे भोसले (छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलते) यांचा ३९९ वा. स्मृती दिन संपन्न झाला. भातोडी येथे इ. स. १६२४ साली झालेल्या मोगल व आदिलशाही यांच्या संयुक्त सैन्याविरुद्ध निजामशाही कडून लढतांना महाबली शहाजी राजे व वीर शरीफजीराजे भोसले यांनी पराक्रम गाजवला होता.त्या 'भातवडी युद्धात' वीर शरीफजीराजे धारातीर्थी पडले होते. भातोडी येथे वीर शरीफजीराजे यांच्या समाधी स्थळावर भातोडी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात इतिहास अभ्यासक श्री. पांडुरंग ढगे यांनी व्याख्यान करताना भातोडी ला चारशे वर्षांचा समृद्ध इतिहास आहे व वीर शरीफजीराजे आणि महाबली शहाजी महाराज यांच्या पराक्रमातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. भातोडी येथेच मराठा इतिहासात पहिल्यांदाच 'गनिमी काव्याचा' वापर झाल्याचे निदर्शनास आणून दिले.
शिवव्याख्याते प्रा. संजय टाक यांनी भातोडीतील ऐतिहासिक स्थानांचा आढावा घेतांना भातोडी ही प्राचीन काळी भाताची मोठी बाजारपेठ होती. येथे भातोडी तलाव, नृसिंह मंदिर,हत्ती हौद, कलावंतीण महाल व हत्ती घोडे प्रशिक्षण केंद्र असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी मेजर श्री. सुभाष लबडे यांच्या हस्ते समाधी व ध्वज पूजन करण्यात आले. या प्रसंगी सरपंच श्री. विक्रम लबडे, उपसरपंच श्री.राजु पटेल,रयत चे सदस्य श्री. ज्ञानदेव पांडुळे, मास्टर मांइडचे प्रा. मारुती शेळके, गडवाट चे डॉ.नितीन भोसले,इतिहास अभ्यासक श्री. ज्ञानेश्वर आजबे, ग्रामपंचायत सदस्य श्री. विक्रम गायकवाड, श्री. कैलास गांगर्डे, श्री. जालिंदर लबडे, अहमदनगर ट्रेकर्स चे श्री. अक्षय टेमकर, शिवभक्त श्री. सुनील क्षीरसागर युवा नेते श्री. अशोक कदम श्री. निसार भाई शेख,श्री.अमोल कदम,पारगाव ग्रा. पं. सदस्य श्री. गणेश गुंड, श्री. प्रदीप शिंदे यांनी आपले विचार मांडले.
यावेळी शिवभक्त श्री. किशोर जी कदम यांच्या सौजन्याने भातोडी ग्रामस्थांच्या वतीने 'वीर शरीफजीराजे भोसले स्मृती पुरस्कार २०२३' देऊन श्री. पांडुरंग ढगे, अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था व अहमदनगर ट्रेकर्स यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी ग्रा. पं. सदस्य श्री.गोविंद लबडे,श्री. सुभाष कचरे,श्री. शाकीर मुलाणी, श्री. सिराज पटेल, सेवा सोसायटी व्हा. चेअरमन श्री. रियाज शेख, सदस्य श्री. भाऊसाहेब धलपे, श्री. घनश्याम लबडे, युवा नेते श्री. बंडु गायकवाड, श्री. घनश्याम राऊत, प्रगतीशील शेतकरी श्री.संदीप लबडे श्री. रोहन भोपे, श्री. पोपट लबडे, श्री. रोहित शिंदे, श्री. ईश्वर लबडे, श्री. कानिफनाथ शिंदे, श्री. विकास पवार, श्री. बंटी कचरे आदि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शिवश्री विलास लबडे पा. यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रा.पं.सदस्य श्री. विक्रम गायकवाड,सरपंच श्री. विक्रम लबडे, उपसरपंच श्री. राजुभाई पटेल व इतिहास प्रेमी श्री. किशोर कदम यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment