सकल धनगर समाजाच्या वतीने ज्येष्ठ नेते राजुमामा तागड , बाळासाहेब कोळसे यांचे बिरोबा मंदिरात आमरण उपोषण

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा तसेच विविध मागण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीनेरविवार  दि.17रोजी मिरी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे आमरण उपोषण करण्यात येणार आहे .या संदर्भात  तहसीलदार  पाथर्डी यांना निवेदन देण्यात आले 2014 ला तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ असं बारामती येथे धनगर बांधवांना विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी शब्द दिला होता मात्र सत्तेत आल्यानंतर फडणीस यांनी शब्द पाळला नसल्याने असे आरोप सकल धनगर समाजाने केला आहे धनगर समाजाला त्यांच्या हक्काचे एसटीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी वेळोवेळी आंदोलने मोर्चे करावे लागले आहेत प्रत्येक सरकार व राजकीय पक्ष धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून जाहीर भूमिका घेतात परंतु फक्त इलेक्शन तोंडावर आल्यावर मात्र सत्तेत आल्यावर काहीच कृती करताना दिसून येत नाही. त्यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.. त्यामुळे सकल धनगर समाजाच्या वतीने ज्येष्ठ नेते राजुमामा तागड व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कोळसे* यांनी सरकारच्या विरोधात दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी मिरी ता. पाथर्डी जी.अहमदनगर येथे बिरोबा मंदिर मिरी ,या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचा इशारा सरकारला दिला आहे. जोपर्यंत सरकार धनगर समाजाला घटनेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी  एस टी मध्ये आरक्षण दिले आहे...परंतु आजही हा भोळा भाबडा समाज अरक्षणापासून वंचित आहे..जो पर्यंत एसटी मधे सामावून घेण्याचा आदेश काढत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याबाबतचे निवेदन माननीय तहसीलदार साहेब पाथर्डी यांना देण्यात आले आहे ,

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post