भाजपा युवामोर्चा जिल्हा सरचिटणीस पदी गुरुनाथ माळवदे
ढोरसडे /अत्रे ग्रामपंचायतचे माझी सरपंच गुरुनाथ एकनाथ माळवदे यांची निवड झाली शेवगाव तालुक्यातील भारतिय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे नुकत्याच प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या सहमतीने जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी भाजपा जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली यामधे युवामोर्चा जिल्हाध्यक्ष म्हणुन अक्षय शिवाजीराव कर्डिले यांची निवड करण्यात आली तसेही भाजपा युवामोर्चा जिल्हा सरचिटणीस म्हणून गुरुनाथ माळवदे यांची निवड करण्यात आली. गुरुनाथ माळवदे यांनी याआधी पक्षामध्ये बूथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, शेवगाव तालुका उपाध्यक्ष, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पक्षामध्ये काम केले आहे. पक्ष्यांचे त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना युवामोर्चा जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे. त्याची निवड झाल्याबद्दल जिल्हा पदाधिकारी, भारतिय जनता पक्षावर प्रेम करणाऱ्यांनी तसेच शेवगाव तालुक्यातील विविध गावातील पक्ष कार्यकर्ते, आप्तेष्ट, नातेवाईक, युवक, मित्रमंडळी यांच्या वतीने शुभेच्या देण्यात येत आहे. आज समाजात विविध प्रकारच्या सामाजिक, वैयक्तिक समस्या आहेत त्या समजावून घेऊन पक्ष पातळीवर सोडवण्यासाठी प्राधान्य देऊ तसेच आगामी काळात पक्ष विचार जनतेत रुजवण्यासाठी जोमाने काम करणार आहे तसेच या पदाचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी करणार आहे असे गुरुनाथ माळवदे यांनी सांगितले. निवडीनंतर ठीक ठिकाणी झालेला सन्मान, सत्कारमुळे आत्मविश्वास वाढणार आहे. खासदार सूजय दादा विखे पाटील, भाजपा प्रदेश चिटणीस श्री अरुण मुंढे, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ताकद वाढवण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Post a Comment