हर घर तिरंगा अभियानासाठी पोस्ट ऑफिसच्या वतीने रविवारी सुध्दा विशेष व्यवस्था● केडगाव मधील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

 हर घर तिरंगा अभियानासाठी पोस्ट ऑफिसच्या वतीने रविवारी सुध्दा विशेष व्यवस्था
● केडगाव मधील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

केडगाव: (प्रतिनिधी)  केंद्र सरकारने दि 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा हे अभियान राबविण्याचे निश्चित केले असून या अभियानाकरिता नागरिकांना राष्ट्रध्वज पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जात असून,आज रविवार असतानाही मा श्री सुरेशजी बन्सोडे प्रवर अधिक्षक डाकघर अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर विभागातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आलेली होती. 
    केडगाव पोस्ट ऑफिसमध्ये श्री संतोष यादव पोस्टमास्तर यांनी या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करत स्वतः केडगाव मधील अनेकांशी संपर्क करत सहभाग होण्याची विनंती करत,आज सुट्टीच्या दिवशीही पोस्ट ऑफिसमध्ये विशेष व्यवस्था केली यांची माहिती अनेकांपर्यंत पोहचवली,ऑफिसमधील पोस्टमन बांधवांच्या मार्फत मागणीनुसार राष्ट्रध्वज उपलब्ध करून दिला.
रविवारी पोस्ट ऑफिस उघडे असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त करत पोस्ट ऑफिसमध्ये याविषयी चौकशी करत,राष्ट्रध्वज घेतला,आज भेट देणाऱ्यामध्ये मा श्री भास्करजी भोस विशेष न्यायदंडाधिकारी अहमदनगर, मा श्री संग्रामजी कोतकर शिवसेना विभागप्रमुख ,मा श्री वाय पी साळवे सेवानिवृत्त प्रवर अधिक्षक डाकघर,श्री के एम कुमठेकर सेवानिवृत्त प्रवर अधिक्षक डाकघर,श्री तुकारामजी ढवळे,
 ह भ प  गहिनीनाथ पालवे महाराज,श्री कमलेश मिरगणे, श्री संदिप कोकाटे, यांनी भेट दिली. 
याकामी पोस्ट ऑफिसमधील श्री अनिल धनावत,श्रीमती ऋतुजा देवकर,श्रीमती श्वेता बिरुदवडे यांचे विशेष योगदान लाभले.

चौकट:
रविवारीची सुट्टी असतानाही हर घर तिरंगा या विशेष मोहिमेत पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून या राष्ट्रीय कार्यात  सहभागी होता आले यांचे विशेष समाधान वाटते.

संतोष यादव
पोस्टमास्तर केडगाव



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post