कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न मिळविणारे कस्टाळू शेतकरी: अशोकराव बडदे

 

(जांभळवाडी ता. वाळवा )येथील अल्पभूधारक शेतकरी श्री. अशोकराव विठ्ठल बडदे हे यागांवातील अल्पभूधारक शेतकरी असुन यागांवामध्ये आज अखेर या परिसरात कोणत्याही प्रकारची शासनाची पाणीपुरवठा स्किम आली नाही यामुळे हा परिसर पूर्वीपासुन कोरडवाहू म्हणून ओळखला जातो. आता नवि पिढी नोकरी व्यावसायासह आपल्या असणाऱ्या वडिलोपार्जीत जमिनीत शेती आधुनिकीकरणाकडे वळलेली दिसत आहे. अशाच एक प्रयोग अल्पभूधारक शेतकरी अशोकराव बडदे यांनी केला असुन त्यांच्या असणाऱ्या २० गुंठे क्षेत्रामध्ये आल्ले या पिकाची लागवड करून जवळपास ५ लाख रूपये पर्यतचे उत्पन्न मिळविले आहे. अलिकडच्या काळात शेती क्षेत्रामध्ये कामात रस असणाऱ्या तरुण वर्गाने आदर्श घ्यावा असे काम एका सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अशोकराव बडदे यांनी केले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले कि, पारंपारीक पिकांबरोबरच कमी कालावधीत उत्पन्नाखाली येणारी पिके करण्याकडे अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. अतिशय कस्टातुन मी आल्ले पिकाची लागवड केली यामध्ये मला समाधानकारक यश मिळाले आहे. या यशामध्ये माझ्या परिवासह गांवातील शेतकरी वर्गाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. ज्या ठिकाणी पाण्याचे स्तोत्र कमी आहे. अशा विभागातील शेतकरी बांधवांनी कमी कालावधीत उत्पन्न देणाऱ्या निरनिराळ्या पिकांची लागवड करणे आवश्यक आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post