नियोजन समितीच्या बैठकीत विविध कार्यक्रमांचे नियोजन
नगर - इंग्रजांना वेगवेगळ्या युद्धात तब्बल 18 वेळा पराभुत करणार्या शूर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या शौर्ययात्रेचे पुणे ते इंदौर आयोजित करण्यात आले असून, ही यात्रा नगरला 8 मे 2023 रोजी एक दिवस मुक्कामाला थांबणार असून या निमित्त समाज प्रबोधन करण्यात येणार आहे.
ही शौर्ययात्रा केडगांव येथे आल्यानंतर बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन स्टेट बँक चौक, डिएसपी चौक, प्रेमदान चौक, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, भिस्तबाग येथे समारोप करण्यात येणार आहे. या ठिकाणी समाज बांधवांच्यावतीने या शौर्ययात्रेचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करुन पायी मिरवणुकीने गंगा लॉन येथे मुक्कामी थांबणार आहे.
या शौर्य यात्रेच्या मार्गवर धनगर समाजाचे पारंपारिक गजनृत्य, घोडे, उंट, ध्वजधारी पादचारी असा दिमाखदार सोहळा करण्याचे नियोजन असून, या संदर्भात समाजाच्या प्रतिष्ठीत बांधवांनी लोकवर्गणी दिली आहे. या शौर्ययात्रेच्या निमित्ताने विविध भागातील लोकप्रतिनिधी समाजप्रेमींची समिती गठीत करण्यात आली असून, केडगांव ते गंगा लॉन या मार्गावर विविध ठिकाणी स्वागत होणार आहे.
नगर येथील नियोजनाच्या बैठकप्रसंगी राजेंद्र पाचे, सुभाष भांड, वसंत दातीर, राजेंद्र तागड, निवृत्ती दातीर, प्रा.शरद दलपे, चंद्रकांत तागड, निशांत दातीर, ज्ञानदेव घोडके, ज्ञानेश्वर भिसे, ऋषी ढवण, विनय भांड, खंडू कजबे, अंबदाास पाचे, ज्ञानदेव तागड आदिंसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment