पोस्ट :महिला प्रधान एजंट यांचे काम समाजासाठी उल्लेखनीय...संतोष यादव ●आर डी योजना लोकप्रिय करण्यात मोठं योगदान

 




पोस्ट :महिला प्रधान एजंट यांचे काम समाजासाठी उल्लेखनीय...संतोष यादव

●आर डी योजना लोकप्रिय करण्यात मोठं योगदान


केडगाव: भारतीय डाक विभागाच्या विविध योजना लोकाभिमुख करण्यात मोठं योगदान असणाऱ्या महिला प्रधान एजंट यांचे काम निश्चितच अभिमानस्पद आहे असे गौरवउद्गार श्री संतोष यादव  यांनी केडगाव पोस्ट ऑफिसमध्ये आयोजीत केल्या गेलेल्या  जागतिक महिला दिन कार्यक्रमात केले.

समाजामध्ये घरोघरी संपर्क पोस्टाच्या आर डी योजनेचे  काम करणाऱ्या महिला प्रधान एजंट,या पोस्टाच्या विविध योजना लोकाभिमुख करण्यात महत्वाचे  भूमिका बजावतात,सर्वच घटकातील नागरिकांना बचतीचे सवय लावत त्याची ठेव पोस्टाच्या सुरक्षित योजनेत गुंतवितात त्याच्याद्वारे  हे महत्त्वाचे व अनमोल काम होते त्यामुळे त्याना  समाज व्यवस्थेमध्ये अतिशय मानाचे स्थान आहे, आजच्या या संगणकाच्या युगात पोस्ट ऑफिसच्या कामकाजात प्रचंड वेगाने बदल होत असून,महिला प्रधान एजंट यांच्याही कामकाजात  ही मोठया प्रमाणात  बदल  झालेला असून तो बदल स्वीकारत त्या  अत्यंत काळजीपूर्वक काम करत आहेत हे निश्चितच आम्हासाठी अभिमानाची बाब आहे.

या दिनाचे औचित्य साधत खास मुलीकरिता असणारी पोस्टाची लोकप्रिय योजना सुकन्या समृद्धी योजनेचे आज केडगाव पोस्ट ऑफिसमध्ये  21 बालिकेचे नवीन सुकन्या  खाते उघडत त्याना श्रीमती जी हनी  अधिक्षक डाकघर यांचे हस्ते पुस्तक वितरित केले गेले.

पोस्टाची लोकप्रिय योजना पोस्टल लाईफ इन्शुरन्स मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या  श्रीमती शुभांगी मांडगे,व सविता ताकपेरे यांनीही या आर्थिक वर्षात प्रत्येकी  दिड करोड पेक्षा जास्त व्यवसाय करून एक आदर्शवत काम केले त्याचा ही विशेष सन्मान आजच्या दिनी करण्यात आला. 

महिला दिनाच्या निमित्ताने उल्लेखनीय काम करणाऱ्या  महिला प्रधान एजंट श्रीमती लता कोरे,पंकजा धर्म,,कुसुम रोहकले,अंजली जोशी, संगीता शर्मा, वंदना संचेती,भारती झावरे, यांचे डाक विभागातील श्रीमती शुभांगी मांडगे,सविता ताकपेरे, श्वेता बिरुदवडे,वैष्णवी बहिर,ऋतुजा देवकर,कल्पना घोडे यांचा विशेष गौरव डाक अधिक्षक श्रीमती  जी हनी यांनी केला.

कार्यक्रम यशस्वी करणेसाठी श्री अंबादास सुद्रीक,श्री अनिल धनावत,श्री शिवाजी कांबळे,सूर्यकांत श्रीमंदिलकर, यांनी विशेष परिश्रम घेतले





Previous Post Next Post