नगर - अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडिअम अॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्यावतीने घेण्यात आलेल्या आंतरशालेय स्पर्धेत इ. 1 ली अ मधील विद्यार्थीनी कु.समृद्धी सोमनाथ नजान हिने कथाकथन स्पर्धेत द्वितीय क्रमांक तसेच इंग्रजी पठण स्पर्धेत द्वितीय तर दिवा सजावट स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. तिला डॉ.उमेश काळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य प्रभाकर भाबड, इन्चार्ज कविता सुरतवाला आदि उपस्थित होत्या.
कु. समृद्धी हिस वर्गशिक्षिका अर्चना जाधव, व विषय अध्यापिका, आई सौ.सुरेखा नजान यांचे मार्गदर्शन लाभले. तिला अभ्यासाबरोबरच नृत्याची, खेळाची, चित्र काढण्याची विशेष आवड आहे. कु.समृद्धी हिच्या यशाबद्दल भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयाचे प्राचार्य उल्हास दुगड, रुपीबाई बोरा कॉलेजचे प्राचार्य अजयकुमार बारगळ, आजोबा शिवाजी कजबे, माजी प्राचार्य जगन्नाथ बारगळ यांनी तिचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
Post a Comment