पोस्टल संघटनेचे द्विवार्षिक अधिवेशन
श्रीरामपुर: टपाल कर्मचाऱ्याचे अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबितअसून संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला जात आहे,संघटना ही सतत कामगाराच्या न्याय प्रश्नास ,सभासदाचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशीलअसते असे प्रतिपादन नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईजचे राज्यउपाध्यक्ष श्री संतोष यादव यांनी केले.
नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज श्रीरामपुर विभागीय द्विवार्षिक अधिवेशन अनमोल पॅलेस श्रीरामपुर याठिकाणी श्री गोरख दहिवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले यावेळी श्री बबनराव शिंदे,श्री के एस पारखी यादव, सागर आढाव, संदिप कोकाटे, सागर कलगुंडे हे उपस्थित होते.
अधिवेशनास प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून झाली.
संघटनेचे नेते श्री संतोष यादव यांनी आपल्या मनोगतात डाक कर्मचाऱ्याच्या विविध समस्यावर सविस्तरपणे प्रकाश टाकला, डाक विभागातील कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात संगनिकरण झालेमुळे कामात तत्परता आलेली असून ,वेळीवेळी सिस्टिमला पुरेशी रेंज उपलब्ध होत नसल्याने सिस्टीम मध्ये सातत्याने व्यत्यय येत असल्याने आपणास ग्राहकाच्या रोषास सामोरे जावे लागत असून,यामध्ये सुधारणा,व पुरेशी रेंज मिळणे करिता संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असून लवकरच सर्व सेवा सुरळीत होईल.
श्री के एस पारखी म्हणाले की, श्रीरामपुर विभागातील सभासदाच्या सर्व प्रश्नास रिजनल ऑफिसच्या माध्यमातुन न्याय देण्याचा प्रयत्न केला असून ,आपल्या उर्वरित प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
श्री राजेंद्र विश्वास,श्री बबनराव शिंदे ,संदिप कोकाटे ,सागर कलगुंडे, सागर आढाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
नुकतेच्या संघटनेच्या माध्यमातून श्रीरामपुर सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकहाती विजय मिळवल्याबदल सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला.
राज्य कर्मचारी यांचे जुनी पेन्शन योजना लागु करा यासाठी सुरू असलेल्या बेमुदत संपास या अधिवेशनातील उपस्थिती सभासदाच्या वतीने जाहीर पाठींबा व्यक्त करण्यात आला.
या अधिवेशनात संघटनेचे पुढील दोन वर्षाकरिता कार्यकारणी निवडण्यात आली.
संघटनेच्या अध्यक्षपदी श्री शैलेश जगताप विभागीय सचिवपदी श्री गोरक्ष कांबळे तर खजिनदारपदी विनायक मोहन तर पोस्टमन संघटनेच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर दौड, सचिवपदी राहुल बडाख ,खजिनदार म्हणून अक्षय जोशी व ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या अध्यक्षपदी रमेश निर्मळ,सचिव म्हणून चांगदेव लांगोरे, तर खजीनदार पदी डॉ चेतन बारहाते यांची पुढील दोन वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी श्री राजेंद्र विश्वास,श्री शंकर राख, शिवाजी चाफे,गफूर सय्यद, राजू शेख,राहुल काळे श्रीमती बेलसरे ,श्री महाले दादा,यांचेसह श्रीरामपुर विभागातील संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती विजया शहाणे आभार श्री शंकर राख तर सूत्रसंचालन श्री विकास लांडे यांनी केले.
Post a Comment