अहमदनगर- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित कलारंग महोत्सव दिनांक १५ आणि१६ फेब्रुवारी २०२३ या काळात प्रेक्षकांच्या मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर शाखेच्या वतीने कलारंग महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते कलारंग महोत्सवाचे उदघाटन झाले यावेळी जेष्ठ नाट्यकर्मी प्रा.मधुसूदन मुळे, डॉ. .सोमनाथ मुटकुळे, अभिनेते. प्रकाश धोत्रे,.मोहिनीराज गटणे,नाट्य परिषद अहमदनगर शाखा अध्यक्ष .अमोल खोले,प्रमुख कार्यवाह .सतीश लोटके,महानगर शाखा अध्यक्ष .संजय लोळगे, .क्षितिज झावरे, नियामक मंडळ सदस्य .सतीश शिंगटे,.श्रेणीक शिंगवी,डॉ..मयूर तिरमखे,.अविनाश ओहोळ,.अंतून घोडके,डॉ..प्रकाश कांकरिया,डॉ.सौ.सुधा कांकरिया,प्रा.बाळासाहेब सागडे उपस्थित होते.
या महोत्सवात राज्य नाट्य स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेते रंगकर्मी प्रतिष्ठान अहमदनगर निर्मित .अरविंद लिमये लिखित .नाना मोरे दिग्दर्शित एका उत्तराची कहाणी आणि अहमदनगर जिल्हा हौशी नाट्य संघ निर्मित तुमचं आमचं प्रस्तुत .कृष्णा वाळके लिखित दिग्दर्शित म्हातारा पाऊस या नाटकांचा प्रयोग अनुक्रमे १५ आणि १६ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री ८:०० वाजता माऊली सभागृह येथे संपन्न झाले.
यावेळी बोलताना आ..संग्राम जगताप म्हणाले की उत्तम कलाकार घडण्यासाठी संधी उपलब्ध होणे गरजेचे असते आणि हे कार्य नाट्य परिषद अहमदनगर शाखेच्या माध्यमातून सातत्याने प्रभावीपणे होत आहे.
डॉ. सोमनाथ मुटकुळे म्हणाले की राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्व संस्था एकत्र येऊन उत्तम कलाकृती सादरीकरण करण्यासाठी भविष्यात नियोजन झाले पाहिजे.
अभिनेते प्रकाश धोत्रे यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक श्री.सतीश लोटके यांनी केले,सूत्रसंचालन श्री.सागर मेहेत्रे यांनी तर आभार .शशिकांत नजान यांनी मानले.
अहमदनगरच्या नाट्य चळवळीत सादर होणाऱ्या उत्तम कलाकृती रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळाव्यात आणि यातून कलाकारांना प्रोत्साहन मिळावे नाट्य चळवळ अधिक प्रभावी व्हावी हा हेतू आहे असे अध्यक्ष श्री.अमोल खोले यांनी सांगितले.
कलारंग महोत्सव यशस्वी करण्यासाठी
सर्वश्री तुषार चोरडिया,अभिजित दरेकर,सुनील राऊत,अविनाश कराळे,नाना मोरे,पुष्कर तांबोळी,गणेश लिमकर यांनी परीश्रम घेतले.राज्य नाट्य स्पर्धेतील विजेते नाट्य संघ,कलाकार व तंत्रज्ञ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Post a Comment