खा.सुजय विखे, आ.प्रा.राम शिंदे, आ.रामहरि रुपनर, आ.संग्राम जगताप, पोपटराव गावडे यांच्या उपस्थितीत
नगर - धनगर समाज सेवा संघ अहमदनगरच्यावतीने राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याचे रविवार दि.19 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 वा. गंगा लॉन्स, निर्मलनगर, अहमदनगर येथे आयोजन केले आहे. या मेळाव्यास खा.डॉ.सुजय विखे पा., माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदे, आ.रामहरि रुपनर, आ.संग्राम जगताप, पोपटराव गावडे, महापौर रोहिणी शेंडगे, हभप बाबासाहेब महाराज मतकर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राजेंद्र तागड यांनी दिली.
या वधू-वर मेळाव्यात जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यातीलही वधू-वर, पालक उपस्थित असणार आहेत. वधू वर नोंदणी पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. तसेच वर्षभरात विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्या समाजातील मान्यवरांचाही गौरव करण्यात येणार आहे.
तरी या मेळाव्यास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ज्येष्ठ मार्गदर्शक पी. आर. शिंदे, वसंतराव दातीर, दशरथ लांडगे, इंजि.राजेंद्र पाचे, सूर्यकांत तागड, ज्ञानेश्वर घोडके, ज्ञानेश्वर भिसे, विजय शिपणकर, डॉ. नामदेव पंडित, प्रा.शरद धलपे यांनी केले आहे .
वधू-वर मेळाव्या बरोबरच समाज प्रबोधन व्हावे म्हणून समाजातील उच्च पदस्थ मान्यवर उदबोधन करणार असल्याचे पत्रकार निशांत दातीर, प्रा सोपान राहींज सर यांनी सांगितले.
---------
कृपया प्रसिद्धीसाठी निशांत दातीर (मो.9850203745)
Post a Comment