पोस्टल संस्थेची सत्ता पुन्हा श्री गजानन प्रगती पॅनलच्या हाती*
●पोस्टल संस्थेची पंचवार्षिक निवडणूक संपन्न
श्रीरामपुर: श्रीरामपुर पोस्टल डिव्हिजन को ऑप क्रेडीट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक दि 08 जानेवारी रोजी प्रधान डाकघर येथे संपन्न झाली त्यामध्ये श्री गजानन प्रगती पॅनलचे अकरा उमेदवार विजयी झालेचे अधिकृत घोषणा श्री आर एस जोशी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली.
या निवडणुकीत दोन पॅनलच्या माध्यमातून लढवली गेली त्यामध्ये श्री बी एस शिंदे ,श्री संतोष यादव व श्री गोरख दहिवाळकर यांच्या नेतृत्वाखालील श्री गजानन प्रगती पॅनल व श्री सारंग खडक्कर यांचे नेतृत्वाखाली स्वाभिमानी परिवर्तन पॅनलच्या वतीने एकूण बावीस उमेदवार निवडणूकमध्ये उतरले होते त्यामध्ये श्री गजानन प्रगती पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. गेल्या पंचवीस वर्षापासून
ही संस्था याच पॅनलच्या माध्यमातून कार्यरत असून,*कमीतकमी व्याजदरामध्ये *जामिनकी मुक्तकर्ज* देणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था म्हणून या संस्थेची ओळख आहे.म्हणूनच ही संस्था प्रत्येक निवडणूकीत सभासदाच्या विश्वासास पात्र ठरत आहे. सभासद या पॅनलवर विश्वास व्यक्त करतात.
विजयी उमेदवारामध्ये श्री सागर आढाव,राहुल काळे,गोरक्ष कांबळे शिवाजी चाफे,रावसाहेब खरात,माधव पेहरे,राधकिसन पवार,सौ विजया शहाणे, श्रीमती मीरा जगधने, राजेंद्र विश्वास,शंकर राख हे विजयी झाले.
निकाल घोषित झालेनंतर द्वारेसभेत श्री बबनराव शिंदे,श्री संतोष यादव यांनी आपले मनोगत वक्त करत नूतन संचालक यांचा यथोचित सत्कार करून त्याना आगामी कालावधीसाठी शुभेच्छा दिल्या.
अहमदनगर जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या या संस्थेचे सभासद स्थानांतर मुळे संपूर्ण राज्यभर पसरलेले असून ,या निवडणुकीसाठी विभागातील सर्व सभासद, याचेसह अहमदनगर,पुणे,पंढरपूर, नागपूर येथूनही संस्थेचे सभासद सहभागी झाले होते.
यावेळी सर्वश्री राजेश नेतनकर, गफूर सय्यद, सागर पंचारिया,श्री संजय बोदर्डे,श्री प्रकाश कदम,शैलेश जगताप,उदय बंडगर,शशी पवार,श्रीमती शहेनाज तांबोळी,श्रीमती वर्षा दंडवते,राजन पवार,विनायक मोहन,बाळासाहेब थोरात, विकास लांडे,कल्पेश वाघ यांचे सह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
Post a Comment