धनगर समाज सेवा संघाच्यावतीने वधू-वर मेळाव्याचे आयोजन
21 जानेवारीपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
नगर - धनगर समाज सेवा संघ अहमदनगरच्यावतीने 19 फेब्रुवारी 2023 रोजी गंगा लॉन्स, निर्मलनगर, अहमदनगर येथे राज्यस्तरीय वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यातही संपर्क दौरा केले जात असून, सर्वत्र अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. वधू वर नोंदणी, पुस्तिकेचे काम अंतिम टप्प्यात आले असून इच्छूकांनी 21 जानेवारी 2023 पर्यंत नावनोंदणी करावी.
वधू-वर मेळाव्याचे हे 7 वे वर्ष असून, धनगर समाजातील सर्व पोटशाखा या मेळाव्यात सहभागी होत असतात. राज्य पातळीवर घेण्यात येणार्या मेळाव्यांपैकी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगांव नगर जिल्ह्यातील चौंडी या गावी असल्याने या मेळाव्याला राज्य पातळीवर विशेष महत्व असते. सध्याच्या नामांतराच्या पार्श्वभुमीवर राज्यातील अनेक संघटना या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. मेळाव्यात उच्च पदस्थ मान्यवर प्रबोधन करणार आहेत.
मेळावा यशस्वीतेसाठी ज्येष्ठ मार्गदर्शक पी.आर.शिंदे, अध्यक्ष राजेंद्र तागड, वसंतराव दातीर, दशरथ लांडगे, इंजि. राजेंद्र पाचे, सूर्यकांत तागड, ज्ञानेश्वर घोडके, ज्ञानेश्वर भिसे, विजय शिपणकर, डॉ. नामदेव पंडित, शरद धलपे, पत्रकार निशांत दातीर, प्रा सोपान राहींज यांनी केले आहे.
----------
कृपया प्रसिद्धीसाठी राजेंद्र तागड (मो.9890100173)
Post a Comment