अहमदनगर दिनांक- युनायटेड केनल क्लब ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी गंगा उद्यान मागील मैदानात अहमदनगर केनल क्लब यांच्या वतीने आयोजित डॉग शोची जय्यत तयारी झाली असून मान्यवरांच्या उपस्थितीत शोचे उदघाटन होणार आहे अशी माहिती अध्यक्ष श्री.रमेश शिंदे यांनी दिली.
अहमदनगर येथे मान्यताप्राप्त या डॉग शो ला मोठा प्रतिसाद मिळाला असून आत्तापर्यंत १०० श्वान प्रेमी यांनी आपल्या लाडक्या पाळीव श्वानाची नोंदणी केली आहे अशी माहिती सचिव श्री.सचिन क्षीरसागर यांनी दिली.
तसेच १० फूट भव्य ट्रॉफी ही या डॉग शो चे मुख्य आकर्षण ठरले आहे असेही क्षिरसागर यांनी सांगितले.
आय लव्ह नगर मुख्य प्रायोजक असून टच फाउंडेशन सह प्रायोजक आहेत तसेच नगरी व्हिलेज,श्री.विपुल शेटीया, श्री.विकी इंगळे यांच्यासह अनेक प्रयोजकांनी डॉग शो साठी पाठबळ दिले आहे. असे श्री.निखिल परदेशी यांनी सांगितले.
डॉग शोचे उदघाटन आ.श्री.संग्राम जगताप,उद्योजक श्री.नरेंद्र फिरोदिया,श्री.गौतम मुनोत,माजी नगरसेवक श्री.धनंजय जाधव ,श्री.अजिंक्य बोरकर यांच्या उपस्थितीत दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९:०० वाजता गंगा उद्यान मागील मैदानात होणार आहे.शहरातील आणि जिल्ह्यातील श्वानप्रेमींनी या डॉग शो ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा असे आवाहन श्री.शशिकांत नजान यांनी केले आहे.
युनायटेड केनल क्लब अंतर्गत अहमदनगर केनल क्लब आयोजित अहमदनगर चा डॉग शो यशस्वी करण्यासाठी श्री.हर्षद कटारिया
श्री.भावेश परमार,श्री.संकेत साळुंके,प्रशांत बुऱ्हाडे,श्री.अक्षय दहातोंडे,श्री.दुर्गेश गाडेकर ,प्रा.प्रवीण कुटे सर,निखिल परदेशी,विश्वास खिलारी ,रोहन सांगोळे, आकाश कवडे, अमजद शेख परिश्रम घेत आहेत.
डॉग शो मध्ये सहभाग नोंदणी करण्यासाठी प्रवेश फी ९०० रुपये असून याच फी मध्ये सहभागी डॉगचे युकेसी चे रजिस्ट्रेशन करण्यात येईल असे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
प्रयत्नशील आहेत.
Post a Comment