अहमदनगर फिल्म फाऊंडेशन च्या 4 थ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महत्सवास नगरकर सज्ज , मिळणार 60 देशातील निवडक चित्रपटांची मेजवानी.

 




अहमदनगर फिल्म फाऊंडेशन च्या वतीने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 26 ते 28 जानेवारी 2023 रोजी आयोजीत करण्यात आलेले असुन .  आमदार .संग्राम जगताप ,उपमहापौर .गणेश भोसले स्वागताध्यक्ष .गौतम मुनोत ,सचिव   प्रशांत   जठार, निमंत्रक .शशिकांत नजान, .विराज मुनोत, .वसी खान, सिद्धार्थ टेमकर , महेश गदादे , सिद्धार्थ खंडागळे हे अहमदनगर फिल्म   फाऊंडेशन चे सदस्य तर जीतो ट्रेड फेअर चे सुरेश कांकरिया अमित मुथा आलोक मुनोत सुनील मुनोत उपस्थितीत चित्रपट महोत्सवाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. यावेळी बोलताना .संग्राम जगताप म्हणाले की अहमदनगरच्या चित्रपट क्षेत्रात इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ अहमदनगर  मोलाचे कार्य करीत असून चित्रपट निर्मिती, कलाकारांना प्रोत्साहन, नगर शहरात चित्रीकरण , चित्रपट कलाकारांना रोजगार उपलब्ध करण्याचे काम या फेस्टिवलच्या माध्यमातून होत आहे.
ह्या मोहत्सवामधे आत्तापर्यंत 60 देशामधुन 400 पेक्षा जास्त  चित्रपटांचा सहभाग झालेला आहे  .विविध देशातील वेगवेगळ्या विषयांवर आधारीत असलेल्या व तीथल्या संस्कृतीचे विश्लेषण करणाऱ्या ,तीथल्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या लघुपट व चित्रपट या महोत्सवा दरम्यान नगरच्या चित्रपट रसिकांना पहायला मिळणार आहेत . भारतीय चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर या महोत्सवाच्या आयोजनास सहकार्य करीत आहेत . तसेच चित्रपट आणि लघुपट निवड समीतीचे अध्यक्ष म्हनुन प्राख्यात चित्रपट दिग्दर्शक,समीक्षक, प्राध्यापक, संतोष पठारे यानी पदभार स्विकारला आहे.  तसेच या महोत्सवात सहभागी होणाऱ्या आणि नगर मधील कलाकारांसाठी विविध उपक्रम राबवण्याचा मानस आहे . नगर हे चित्रपटासाठी अत्यंत पोषक शहर आहे. इथे चित्रीकरण करण्या साठी खुप वाव आहे ,बाहेरील निर्मिती संस्थांना नगर मध्ये चित्रीकरण करण्यासाठी निमंत्रित करणार आहोत असे चित्रपट निर्माते आणि महोत्सवाचे स्वःताध्यक्ष गौतमजी मुनोत यांनी सांगितले . ह्या महोत्सवाच्या निमित्ताने अहमदनगर मधे चित्रपट उद्योगाला चालना मिळावी या हेतूने नगर मधील सर्व    चित्रीकरण स्थळांची यादी केली जाणार आहे असे अहमदनगर फिल्म फाऊंडेशन चे सचिव प्रशांत जठार यांच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.
अहमदनगर येथे दिनांक २६,२७ आणि २८ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ अहमदनगर मध्ये देश विदेशातून मोठा प्रतिसाद मिळाला असून विविध विषयांवरील लघुपट,माहितीपट पाहण्याची संधी चित्रपट रसिकांनी मिळणार आहे, अशी माहिती निमंत्रक शशिकांत नजान यांनी दिली.
चित्रपट महोत्सव यशस्वी करण्यासाठी
संयोजन समिती परिश्रम घेत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post