जागतिक मधुमेहदिनी डाक विभागातील कर्मचाऱ्यांची विशेष तपासणी शिबीर ●अहमदनगर डाक विभागाचा उपक्रम




अहमदनगर: जागतिक मधुमेहदिनी  अनु यश आरोग्य प्रतिष्ठान बाणेर पुणे यांच्यावतीने अहमदनगर प्रधान डाकघर येथे डाक विभागातील कर्मचाऱ्यांसाठी डायबिटीस चेकअप  कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.

अहमदनगर डाक विभागाचे अधिक्षक श्री हेमंत खडकेकर यांच्या विशेष पुढाकाराने तर मा श्री संतोष जोशी सहायक अधिक्षक मुख्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली  संस्थेचे वरीष्ठ स्वास्थ्य प्रचारक मा श्री संदीपजी मुळे , श्री अरविंद येडे, श्री गणेश जाधव,श्री प्रदिप मगर ,विक्रांत शिंदे यांनी सहभागी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत,जवळपास पन्नास कर्मचाऱ्यांचे डायबिटीस चेकअप केले.काही कर्मचारी यांना पुढील तपासणी करून तज्ञ डॉक्टर यांच्या सल्ल्याने उपचार घेण्याचा सूचना देण्यात आल्या.

संस्थेचे वरीष्ठ राष्ट्रीय स्वास्थ्य प्रचारक मा श्री संदिपजी  मुळे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शनासह काही महत्त्वपूर्ण टिप्स त्याचबरोबर मॉर्निंगवॉक,योगा, आवश्यक व्यायाम,फास्टिंग,आपली बदलती जीवनशैली, याविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन केले. 

यावेळी श्री संदीप कोकाटे, संदिप हदगल,श्री संतोष यादव,श्री सोनवणे,श्री कमलेश मिरगणे,श्री तान्हाजी सूर्यवंशी, श्री सतिष येवले,रमित रोहिला,संतोष घुले,श्री अनिल धनावत,श्री राजू कोल्हे,श्री पीर मोहमद चौगुले, भाऊसाहेब जाधव,श्रीमती स्मिता कुलांगे,श्रीमती संयुक्ता पोळ,निलिमा शेकटकर, श्रीमती अर्चना भुजबळ,शुभांगी सस्कर,श्रीमती रंजना कदम,यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post