अहमदनगर- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर शाखेच्या वतीने दिनांक १६ आणि १७ ऑक्टोबर २०२२ रोजी आयोजित कालारंग महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी मा.आ.श्री.संग्राम भैय्या जगताप यांची निवड झाली अशी माहिती अध्यक्ष श्री.अमोल खोले यांनी दिली. या कलारंग महोत्सवात
दिनांक-१६ ऑक्टोबर रोजी अभिवाचन स्पर्धा, तसेच थोड्या गप्पा थोडी गाणी या संगीत संध्येचे आयोजन करण्यात आले आहे ही संगीत संध्या महाराष्ट्राची महागायिका सौ.सन्मिता धाकटे-शिंदे आणि सहकारी सादर करणार आहेत.दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध अभिनेते श्री.प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता लाड यांची प्रमुख भूमिका असलेले एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा माऊली सभागृह येथे प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.अधिक माहिती साठी प्रमुख कार्यवाह श्री.सतीश लोटके यांचेशी ९८५०१४४५६५
संपर्क साधावा असे आवाहन उपाध्यक्ष श्री.शशिकांत नजान यांनी केले आहे.
Post a Comment