अहमदनगर: युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार,नेहरू युवा केंद्र व भारतीय डाक विभाग अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आलेले होते.
अहमदनगर भुईकोट किल्ल्यांच्या प्रांगणात मा श्री संतोष जोशी सहायक अधिक्षक डाकघर अहमदनगर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात या दौडचे आयोजन करण्यात आलेले होते.
कर्मचाऱ्यांनी यांनी या दौडमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत किल्ला परिसरामध्ये राष्ट्रीय एकता दौड केली.
या दौडच्या सांगता प्रसंगी सर्व सहभागी कर्मचारी यांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ देण्यात आली
यावेळी अहमदनगरचे पोस्टमास्तर श्री संदीप कोकाटे,केडगावचे पोस्टमास्तर श्री संतोष यादव, श्री विलास कांबळे,श्री अभिमनन्यु कुमार,अनिल कुलकर्णी, तानाजी सूर्यवंशी, कमलेश मिरगणे, देवेन शिंदे,रेवणनाथ सुपेकर, सलीम शेख,श्रीमती संयुक्ता पोळ,श्रीमती शुभांगी सस्कर,श्रीमती स्मिता कुलांगे, श्रीमती शेकटकर ,सुभाष बर्डे,बाबासाहेब शितोळे,रामदास गोसावी,गणेश चौधरी,अर्जुन जटाले, युवराज राऊत, गणेश केसकर, शैलेश राहिंज,यांचेसह मोठया संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते.
Post a Comment