अहमदनगर - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर शाखेच्या वतीने दि.१६ आणि १७ ऑक्टोबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या कलारंग महोत्सवास स्पर्धक, कलाकार, रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून शहरातील सांस्कृतीक भूक मोठी असून भविष्यात याच प्रकारच्या विविध महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल असे स्वागताध्यक्ष आ.श्री. संग्राम जगताप आणि नाट्य परिषद अध्यक्ष श्री.अमोल खोले यांनी सांगितले
जिल्ह्यातील कलाकार,स्पर्धक आणि रसिक प्रेक्षक मोठ्या प्रमाणात एकत्र आले, सांस्कृतिक विचारांची देवाण घेवाण झाली या महोत्सवाचे मोठ्या उत्सवात रूपांतर झाले हे नाट्य परिषद अहमदनगर शाखेच्या कार्याचे यश आहे असे प्रमुख कार्यवाह श्री.सतीश लोटके आणि उपाध्यक्ष श्री.शशिकांत नजान यांनी सांगितले.
अभिवाचन स्पर्धेने कलारंग महोत्सवाची सुरवात झाली. ही स्पर्धा अतिशय दर्जेदार संपन्न झाली. येथे जेष्ठ अभिनेते श्री.दीपक घारु, व्याख्याते श्री.विठ्ठल बुलबुले, जेष्ठ नाट्यकर्मी अय्युब खान, संजय आढाव, सतीश शिंगटे, संजय घुगे, परिषदेचे अध्यक्ष अमोल खोले, प्रमुख कार्यवाह श्री. सतीश लोटके यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक प्रा.डॉ.श्री.संजय दळवी, श्री.सुफी सय्यद यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक हाऊसफुल्ल फाऊंडेशन नगर, द्वितीय आमचे आम्ही पुणे , तृतीय मनसब थिएटर नगर , उत्तेजनार्थ अंतरा प्राॅडक्शन, सवुलियत, चेरिश थिएटर तर वैयक्तिक वाचीक अभिनय प्रथम मधुरा वैद्य झावरे, द्वितीय मनोज डाळींबकर, तृतीय श्वेता पारखे, उत्तेजनार्थ चैताली बर्डे, निवृती गर्जे, धनश्री खोले, विराज अवचित्ते, सिध्दी कुलकर्णी, शिल्पा सरदेसाई, स्पर्धा प्रमुख नाना मोरे, गणेश लिमकर, प्रा.योगेश विलायते, यांनी यास्पर्धेकरिता परिश्रम घेतले.
माऊली सभागृहात युवा नाट्य गौरव पुरस्कार ॲड. अभिजीत दळवी, ॲड. पुष्कर तांबोळी यांना, २०२२ यावर्षात कलाक्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली म्हणून त्यांना युवा नाट्य गौरव देण्यात आला. दळवी व तांबोळी यांना यंदाचा कुंकूमार्चन या लघूपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच श्री. गणेश शिंदे , प्रसिध्द व्याख्याते यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार मा.जिल्हाधिकारी डॉ. श्री.राजेंद्र भोसले, आ. श्री.संग्राम जगताप डॉ.राकेश गांधी, श्री. राजेश भंडारी, आदिनाथ हजारे, मनिष ठुबे, संगमनेर नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉ.प्रा. संजयकुमार दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले तर सागर मेहेत्रे यांनी आभार मानले. त्यानंतर महाराष्ट्राची महागायिका सौ.सन्मिता धापटे- शिंदे, प्रसिद्ध व्याख्याते,निवेदक श्री.गणेश शिंदे यांनी येथील माऊली सभागृह येथे "थोडी गाणी-थोड्या गप्पा" हा उत्तरोत्तर बहरात जाणारा संगीत संध्या कार्यक्रम सादर केला. शहरातील रसिकांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले.
कलारंग महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध अभिनेते श्री.प्रशांत दामले आणि कविता लाड यांची प्रमुख भूमिका असलेले "एका लग्नाची पुढची गोष्ट" या नाटकाच्या हाऊसफुल्ल प्रयोगाने महोत्सवाची सांगता झाली.
या वेळी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ अभिनेते,दिग्दर्शक,लेखक श्री. अय्युब खान यांना देण्यात आला. तसेच प्रसिध्द अभिनेते प्रशांत दामले यांच्या नाटकाचे १२५०० प्रयोग रंगभूमीवर झाले. त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून नोंद होणार आहे. याबद्दल त्यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.श्री.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री घुले, चित्रपट निर्माते नरेंद्र फिरोदिया, डॉ.राकेश गांधी, श्री.धनंजय जाधव, आदिनाथ हजारे, सौ.शबाना खान, धनश्री खोले, सतीश शिंगटे, परिषदेचे अध्यक्ष श्री. अमोल खोले प्रमुख कार्यवाह श्री. सतीश लोटके यांच्या प्रमुख उपस्थितीत होते.
याप्रसंगी अभिनेते प्रशांत दामले म्हणाले, जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याने अय्युब खान यांची जबाबदारी वाढली आहे. कोणताही माणूस परिपूर्ण नसतो त्याच्या हातून काही ना काही चुका होतात. त्या चुका जीवनात सुधारायच्या असतात. नाट्यकला सादर करतांना चुका होतातच परंतु चुका सुधारण्याची संधी फक्त नाट्य कलेत मिळते. सर्व मान्यवर व रसिकांनी टाळ्यांच्या गजरात जेष्ठ नाट्यकर्मी अय्युब खान यांचे अभिनंदन केले.
जेष्ठ नाट्यकर्मी अय्युब खान म्हणाले, नगरच्या मातीने मला घडविले आहे. अनेक दिग्गज कलाकारांच्या सोबत नगरच्या रंगभूमीवर कार्य केले. यापुढेही कलाक्षेत्रात सक्रीयपणे कार्य करणार आहे.
महोत्सव यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष शशिकांत नजान, कोषाध्यक्ष तुषार चोरडिया, सहकार्यवाह सागर मेहेत्रे, नाना मोरे, सुनील राऊत, अभिजीत दरेकर, प्रा.योगेश विलायते, प्रा.शुभांगी कुंभार,प्रसाद बेडेकर गणेश लिमकर , शैलेश देशमुख , बंटी ढोरे प्रयत्नशील आहेत.
Post a Comment