आरोपींना अटक करा अन्यथा आंदोलन करू खंडागळे

 
आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा आरोपींमध्ये समावेश असल्याने तत्काळ अटक करून पदावरून निलंबनाची मागणी

नेवासा - तालुक्यातील वांजोळी या गावातील पांढरीपुल येथे एका महिलेच्या घरात घुसून पांढरीपुल येथील महेश कारभारी कर्डिले, डॉ.योगेश कारभारी कर्डिले यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देऊन अश्लील वर्तन केल्याने दोन्ही आरोपींवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र घटना घडून आणि गुन्हा दाखल होऊन काही काळ उलटला असून देखील आरोपी मोकाट फिरत आहेत, आरोपींना तत्काळ अटक करून जेऊर,(ता.नगर)आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी आरोपी डॉ.योगेश कारभारी कर्डिले यांच्या निलंबनाची मागणी वांजोळी चे माजी चेअरमन बद्रीनाथ खंडागळे यांनी केली असून आरोपी लवकरात लवकर अटक नाही झाले तर कोणत्याही क्षणी नगर औंगाबाद महामार्गावर आंदोलन करण्याचा इशारा खंडागळे यांनी दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post