सागर पंचारिया यांची राष्ट्रीय स्पर्धेत निवड गौरवास्पद :यादव ●डाक विभागीय टेबलटेनिस संघात निवड

 
अहमदनगर: भारतीय डाक विभागाचे वतीने अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी अहमदनगर प्रधान डाकघर येथे सिस्टीम अडमिन म्हणून कार्यरत असणारे श्री सागर शिवकुमार पंचारिया यांची डेहराडून येथे होणाऱ्या  राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली.
भारतीय डाक विभागाचे वतीने प्रत्येक वर्षी डाक विभागातील कर्मचाऱ्यांकरिता आयोजीत राज्यस्तरीय निवड स्पर्धा 2022 दि 7 ते 8 ऑक्टोबर दरम्यान मुंबई येथे संपन्न झाल्या.राज्यभरातून पन्नास पेक्षा अधिक स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. अहमदनगर विभागाच्या वतीने श्री सागर पंचारिया यांनी आपला सहभाग घेतला.
या निवड स्पर्धेतून अकरा स्पर्धकांचा महाराष्ट्र संघ  राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवडण्यात आला. त्यामध्ये सहा पुरुष खेळाडू व पाच महिला यांचा समावेश आहे. त्यामध्ये श्री सागर पंचारिया ( अहमदनगर) यांचेसह श्री नरेंद्र चिपळूणकर, विजय ठाकूर, प्रफुल्ल तेली, दिलीप गवास (मुंबई) यांचा समावेश आहे.
पुढील राष्ट्रीय स्पर्धा नोव्हेंबरमध्ये डेहराडून येथे होणार असून वरील संघ  सहभागी होईल.
श्री सागर पंचारिया यांचे निवडीच्या निमित्ताने त्याचा अहमदनगर प्रधान डाकघर येथे गौरव करण्यात आला यावेळी बोलताना पोस्टल संघटनेचे जेष्ठ नेते श्री संतोष यादव म्हणाले,आपले  दैनंदिन कार्यालयीन कामकाज करत श्री सागर पंचारिया यांनी टेबलटेनिस या खेळाची आवड जोपासली,आजवर  त्यानी पटना, धर्मशाळा हिमाचल ,हैद्राबाद, कोलकाता, रायपूर, मुंबई येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला.
त्याची सातव्यादा राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली ही आपल्याकरिता निश्चितच गौरवाची बाब आहे.
सत्कार प्रसंगी श्री संदीप कोकाटे पोस्टमास्तर, श्री सोनवणे सहायक अधिक्षक, श्री नामदेव डेंगळे चेअरमन पोस्टल पतसंस्था, यांचेसह श्री कमलेश मिरगणे, तान्हाजी सूर्यवंशी, मिलिंद भोंगले, संतोष घुले, दिगंबर शिंदे,सुभाष बर्डे, विजय चाबुकस्वार, अभिमनुकुमार, श्री साहेबराव विधाते, श्री शितोळे, श्री धनंजय दैठणकरयांचेसह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post