इ.3 री आनंददायी अभ्यासक्रमात ‘ निशांत दिवाळी अंक’

 


नगर -  गेल्या 22 वर्षांपासून प्रसिद्ध होणार्‍या निशांत दिवाळी अंकाचे इ.3रीच्या दिवाळी आनंददायी अभ्यास मालिकेत समावेश झाला आहे.  पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील सांगवी येथील इ. 3 री साठीच्या दिवाळी गृहापाठातील अभ्यासक्रमात निशांत दिवाळी अंका संदर्भात पाच प्रश्न विचारण्यात आले आहे. 


मुलांना लहानपणापासून परिसर अभ्यास, साहित्य, लेख, चित्रकला, छंद जोपसण्यासाठी शाळेच्यावतीने दिवाळी सुटीत गृहपाठ दिले जातात. या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वांगिण विकास साधण्याचा शिक्षकांचा प्रयत्न असतो. दिवाळीत फटाके, फराळ याच बरोबर दिवाळी अंक हा साहित्यक ठेवा असतो. त्याची माहिती मुलांना होण्यासाठी असे उपक्रम राबविले जात आहेत.  

राज्यस्तरावर प्रकाशित होणार्‍या निशांत दिवाळी अंक नेहमीच दर्जेदार व सर्व घटकांना आवडेल असे दर्जेदार साहित्य असल्याने अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा अभ्याससाठीही पुरक साहित्य असल्याने असा समावेश  होतो. 

यापूर्वीही नांदेड, सोलापूर, व औरंगाबाद येथील दिवाळी गृहपाठ अभ्यास मालिकेत निशांत दिवाळी अंका संदर्भात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यात आले होते

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post