नगर - दिल्लीगेट तरुण मंडळाच्यवतीने जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज कुमार पाटील यांच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येऊन आरती करण्यात आली. याप्रसंगी मंडळाच्यावतीने त्यांचे मंडळाचे अध्यक्ष गिरिष जाधव यांनी स्वागत केले. यावेळी अशोक दहिफळे, इंजि.विनोद काकडे, संदिप दातरंगे, प्रतिक बोडखे, सलिम शेख, तुळशीदास नगरे, भगवान कोकणे, अशोक पारधे, अविनाश शिंदे, सुनिल सुडके, शया जहागिरदार, अजय भोयर, मंदार मुळे आदिंसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी पोलिस अधिक्षक मनोज पाटील म्हणाले, गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सार्वजनिक उत्सव आहे. नगरमध्येही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. मागील दोन वर्षे शासनाच्या निर्बंधामुळे गणेशोत्सवावर बंधने होती. यंदा शासनाने निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मंडळांनी नियमांचे पालन करत हा उत्सव साजरा करावा. त्याचबरोबर सामाजिक व शासनाच्या उपक्रमांची जनजागृती करावी. दिल्लीगेट हे मंडळाच्या उपक्रम समाजाभिमुख आहेत धार्मिक कार्याला सामाजिक कार्याचे जोड देण्याचे काम करावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष गिरिष जाधव म्हणाले, दिल्लीगेट तरुण मंडळ हे ऐतिहासिक असून, मंडळ नेहमीच धार्मिक, सामाजिक विषयांवर देखावे सादर केले आहे. त्याचबरोबर वर्षभर सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. मागील दोन वर्ष कोरोना काळात गणेशोत्सव काळात गरजूंना मदतीचा हात दिला होता. यंदा गणेशोत्सवाही असेच उपक्रम राबविण्यात येतील, असे सांगितले
Post a Comment