चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतीथी निमित्त उपस्थित रहा: प्रदेशाध्यक्ष . अँड . राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे

 २५ ऑगस्ट रोजी चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतीथी निमित्त आयोजित अभिवादन समारंभास राज्यातील सर्व धनगर समाज बांधवांनी उपस्थित रहा

 प्रदेशाध्यक्ष . अँड . राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे
अहमदनगर (प्रतिनिधि) चौंडी , ता . जामखेड , जि . अहमदनगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २२८ वी पुण्यतीथी गुरूवार २५ ऑगस्ट रोजी येत असुन या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन समारंभास महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष , सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा . अँड . राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे केले आहे .

 येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी लि . इस्लामपूरच्या कार्यस्थळावर वाळवा तालुक्यातील प्रमुख धनगर समाज पदाधिकाऱ्यांच्या बैठकित ते बोलत होते यावेळी बोलताना मा . अँड . राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे म्हणाले कि , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म गांव चौंडी येथील तिर्थ क्षेत्राचा सर्वागिन विकास महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे संस्थापक , महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री मा . श्री . आण्णासाहेब डांगे यांनी केला असून .  पुण्यतिथी निमित्त अभिवादन समारंभास प्रमुख पाहूणे म्हणून माजी सनदी अधिकारी , जेष्ठ विचारवंत मा . श्री . इंद्रजित देशमुख व त्रिपुरा राज्याचे माजी वीज मंडळ अध्यक्ष , महाराष्ट्र महावितरण कंपनी वाणिज्य विभागाचे संचालक मा . डॉ . मुरहरी केळे हे उपस्थित राहणार आहेत. समारंभाच्या अध्यक्षस्थानी धनगर समाजाचे राज्याचे नेते मा. श्री. आण्णासाहेब डांगे आहेत प्रमुख उपस्थितीत माजी आमदार मा. अँड. रामहरी रूपनवर यांच्यासह महाराष्ट्र धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, अहिल्या महिला संघ, कर्मचारी संघटना, प्रदेश सांस्कृतिक विभागाचे सर्व पदाधिकारी विभाग प्रमुख, जिल्हाप्रमुख, जिल्हा - तालुका पदाधिकारी व समाज बांधव उपस्थितीत राहणार आहेत. 

यावेळी महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. अरूण घोडके , सांगली जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव कचरे, मल्हार सेनेचे सांगली जिल्हा प्रमुख सुनिल मलगुडे यांनी मनोगत व्यक्त केली. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक , खरातवाडीचे माजी सरपंच श्री. अविनाश खरात यांची धनगर समाज महासंघाच्या वाळवा तालुका अध्यक्षपदी निवड सर्वानुमते जाहिर करण्यात आली. यावेळी उद्योजक बाबुराव हूबाले , सर्वोदय साखर कारखान्याचे संचालक रमेश हाके , किसन गावडे , ज्ञानू जेडगे , प्रकाश कनप , श्री . बाळासाहेब कोळेकर , चंद्रकांत ताटे , अँड . उमेश कोळेकर , संदीप माने , लालासाहेब अनुसे , पांडूरंग वाघमोडे , शिवाजीराव डांगे , राजाराम गावडे , पोपटराव काळे , रघुनाथ बोते , उमेश गावडे , मंगेश लवटे , विजय कवडेकर , अभिजित रासकर , दत्तात्रय तांदळे , विकास नांगरे , जगन्नाथ भिसे , महादेव वाघमोडे , जयवंत टिबे , गुंडाभाऊ गावडे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते , स्वागत व प्रास्तावीक बजरंग कदम यांनी केले शेवटी आभार किसनराव गावडे यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post