बालरंगभूमी परिषदेचा नाट्यछटा स्पर्धा महोत्सव

 

नगर- बाल कलावंतासाठी कार्य करणारी संघटना बालरंगभूमी परिषद, बाल कलावंताना व्यासपीठ मिळावे, बालरंगभूमी जगताचे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा मानस परिषदेचा आहे. यासाठीच "मानसी भणगे स्मृती नाट्यछटा महोत्सव " या अभिनव स्पर्धेचे आयोजन बालरंगभूमी परिषद, अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने दिनांक १० सप्टेंबर २०२२ रोजी प्राथमिक फेरी तर दिनांक १८ सप्टेंबर रोजी माऊली सभागृह येथे अंतिम फेरी घेण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष उर्मिला लोटके यांनी दिली.  

विद्यार्थ्यांचे पाठांतर, स्पष्ट शब्दोच्चार, सभाधीटपणा, वाचिक व आंगिक अभिनय या घटकांची माहिती नाट्यछटेच्या माध्यमातून बालकलावंतास होईल. ही स्पर्धा तीन गटात होणार असून  गट क्रमांक १ इ. १ली ते ३ री, गट क्रमांक २ इ. ४थी ते ७वी. आणि गट क्रमांक ३  इ. ८ वी १० वी. असा राहील. सादरीकरणाची वेळ ३ ते ७ मिनिटे असेल. या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे अवाहन प्रमुख कार्यवाह प्रसाद भणगे यांनी केले आहे.
नाट्यछटा म्हणजे एकपात्री नाटक, स्वगत, कथाकथन, नाट्यप्रवेश नव्हे तो स्वतंत्र प्रकार आहे.
नाट्यछटा कशी असावी याकरिता एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.
विजेत्यांना सर्वोत्कृष्ट, उत्तम , उत्तेजनार्थ रोख पारितोषिके व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९८३४४५९०३८, ९८८११५४४८९, ८२७५४३८२०२,९२२५३१६६१५  या क्रंमाकावर संपर्क साधावा असे आवाहन स्पर्धा प्रमुख टीना इंगळे, श्रीया देशमुख यांनी केले आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post