राजपत्रित अधिकारी महासंघाच्या उपाध्यक्षपदी भागवत डोईफोडे

 

                                                                           नाशिक :( वार्ताहर) महाराष्ट राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या राज्य उपाध्यपदीनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. राजपत्रित महासंघ हा राज्यातील
विविध खात्यांतील राजपत्रित अधिकाºयांच्या ७० खातेनिहाय संघटनांची शिखरसंघटना आहे. महासंघामार्फत राजपत्रित अधिकाºयांचे प्रश्न , शासन प्रशासनाशी चर्चाविनिमयातून व सौहार्दाच्या वातावरणात सोडविले जातील अशी ग्वाही डोईफोडे यांनी उपाध्यपद स्विकारतांना दिली.दर तीन वर्षांनी महासंघाच्या राज्य कार्यकारिणीची नियमितपणे निवड केली
जाते. वर्ष २०२२-२५ साठी कार्यकारिणी निवडण्यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा मुंबई येथेझाली.या त्रैवार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये राजपत्रित अधिकारी महासंघाच्यानिवडणुकीत राज्यकर उपायुक्त विनोद देसाई यांची अध्यक्ष तर वित्त व लेखा
विभागातील सहाय्यक संचालक समीर भाटकर यांची सरचिटणीस म्हणून निवड करण्यातआली, कोषाध्यक्ष पदी सहकार विभागातील उपनिबंधक नितीन काळे यांची, तसेच १२ उपाध्यक्ष ३ महिला उपाध्यक्ष ; १९ विभागीय सहचिटणीस १९ महिला सहचिटणीस यांची अविरोध निवड झाली.तसेच २० संघटन सचिव महिला संघटन सचिव ९ , १८ जनसंवाद सचिव २१ राज्य संघटक व मुख्यसचिवांच्या अध्यक्षतेखालील संयुक्त विचारविनिमय समितीवरील१५ सदस्य कायम निमंत्रित म्हणून ३ माजी अध्यक्ष यांची चर्चा विनिमयांती निवड करण्यात आली . अधिकारी महासंघाचे संस्थापकग . दि . कुलथे यांची आजीवन मुख्य सल्लागार म्हणून निवड करण्याचा ठराव सवार्नुमते करण्यात आला.अन्य ठरावांमध्ये सुदाम टाव्हरे यांची कल्याणकेंद्र समन्वयक तथा राज्य संघटक रमेश जंजाळ यांची कार्यालय सचिव तथा राज्य संघटक म्हणून निवड करण्याचा ठराव करण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post