अहमदनगर:भारतीय डाक विभागाच्या वतीने पत्रलेखन कलेला प्रोत्साहन देणे करिता पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली आहे. सदर पत्र लेखन स्पर्धेचा विषय *व्हिजन फॉर इंडिया 2047* सदर पत्रलेखन स्पर्धा कोणत्याही भाषेमध्ये म्हणजेच मराठी, हिंदी ,इंग्रजी किंवा प्रादेशिक भाषेमध्ये केली तरी चालते.
सदर स्पर्धेसाठी दोन गट केलेले आहेत 1) 18 वर्षाच्या आतील वयोगट 2)18 वर्षाच्या वरील वयोगट {खुला गट}
प्रत्येक गटामध्ये दोन प्रकारे पत्रलेखन करता येते
●एक आंतरदेशीय पत्र: यामध्ये पोस्टाच्या आंतरदेशीय पत्रावर पत्र लेखन करावयाचे असून यासाठी शब्द मर्यादा 500 शब्दाची असेल.
● लिफाफा: यामध्ये ए -4 साईज पेपरवर पत्रलेखन करावयाचे असून शब्द मर्यादा 1000 शब्दाची असेल. वयाचा दाखला म्हणून प्रत्येक व्यक्तीने पत्रावर मी असे घोषित करतो की दिनांक 01/01/2022 रोजी माझे वय 18 पेक्षा कमी/जास्त आहे असे घोषणापत्र द्यायचे आहे.बक्षीस वितरणाच्या वेळी पुरावा तपासला जाईल.
महाराष्ट्र व गोवा राज्यामध्ये प्रत्येक उपगटातील प्रथम विजेत्याला रुपये पंचवीस हजार, द्वितीय विजेत्याला रुपये दहा हजार व तृतीय विजेत्याला रुपये 5000 असे बक्षीस देण्यात येईल.
प्रत्येक राज्यस्तरातील पहिल्या तीन विजेत्यांची पत्रे राष्ट्रीय स्तरावर पाठविण्यात येतील.
त्यामधून प्रथम विजेत्याला रुपये पन्नास हजार ,द्वितीय विजेत्याला रुपये पंचवीस हजार, तृतीय विजेत्यास रुपये दहा हजार बक्षीस देऊन गौरवण्यात येईल.
या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता 31 ऑक्टोबर 2022 ही अखेरची मुदत असून ही पत्रे
माननीय मुख्य पोस्टमास्टर जनरल महाराष्ट्र सर्कल मुंबई 400001
या पत्त्यावर पाठवायचे आहेत या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे ,याविषयी आपणास काही अडचण असेल तर जवळच्या पोस्टऑफिसशी संपर्क साधावा असे आवाहन अहमदनगर डाक विभागाच्या प्रमुख श्रीमती जी हनी यांनी केले आहे
Post a Comment