नगर -डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने अॅरपलच्या सहयोगाने अॅतपल ट्रेनिंग सेंटर ऑफ एक्सलन्स सुरु केले. या अंतर्गत अॅरपलने महाविद्यालयातील शिक्षकांसाठी तीन महिन्यांचा ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित केला होता. प्रोग्राम पूर्ण झाल्यानंतर नियुक्त प्राध्यापकांची परिक्षा घेण्यात आली. यामध्ये प्रा.रविंद्र लवांडे यांना घत्तघवीत यश मिळाले असून, त्यांना अॅीपलने ट्रेनर म्हणून नियुक्ती केल्याचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याबद्दल त्यांचा महाविद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डेप्युटी डायरेक्टर (टेक्निकल) सुनिल कल्हापुरे यांनी या उपक्रमाचे महत्व सांगून याचा लाभ अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणार्या विद्यार्थ्यांना होणार आहे. तसेच यामधून विद्यार्थ्यांना अॅ्पल सर्टिफिकेट मिळाल्यानंतर नोकरी मिळण्यासाठी याचा फायदा होईल, असे सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय नाईक म्हणाले की, डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकडे लक्ष देत असते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमधील व्यक्तीमत्व विकास, तांत्रिक कौशल्य विकास व संभाषण कौशल्य, आत्मविश्वास वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशिल असते. अॅ्पल ट्रेनिंग सेंटर ऑफ एक्सन्स हे अहमदनगर जिल्ह्यातील अॅतपलचे पहिलेच अधिकृत केंद्र आपल्या महाविद्यालयाने सुरु केले आहे, असे सांगितले.
अॅेपल ट्रेनिंग सेंटर ऑफ एक्सलन्सचे समन्वयक प्रा.संदिप उदावंत यांनी हे ट्रेनिंग सेंटर लवकरच विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
प्रा.रविंद्र लवांडे यांचे डॉ.विखे पा. फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी खा.डॉ.सुजय विखे पाटील तसेच सेक्रेटरी जनरल ऑफिसीएटींग तथा डायरेक्टर (टेक्निकल) डॉ.पी.एम.गायकवाड यांनी अभिनंदन केले.
----------
Post a Comment