भाजपाच्या विजयाची घौडदौड अशीच सुरु राहिल- महेंद्र गंधे
नगर - महाविकास आघाडी सरकार प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरत आहे. जनतेच्या कामाचे त्यांना कसलेही देणे घेणे राहिलेले नाही. फक्त सत्तेच्या माध्यमातून स्वत:चा विकास करण्यावरच त्यांचा भर राहिला आहे. त्यामुळे जनतेमध्ये त्यांची प्रतिमा मलिन झालेली आहे. त्यामुळे आमदारांचाही त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळेच राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाचे तीनही उमेदवार निवडून देत भाजपवर विश्वास दाखविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विविध विकास कामांमुळे भाजप अनेक ठिकाणी विजयी होत आहे. आता यापुढील विधान परिषदेच्या जागांवरही भाजपाचेच उमेदवार निवडून येतील. विजयाची घौडदौड अशीच सुरु राहिल, असा विश्वास भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी व्यक्त केला.
राज्यसभेत भाजपाचे उमेदवार पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक हे विजयी झाल्यानंतर नगर शहर भाजपाच्यावतीने लक्ष्मीकारंजा येथील पक्ष कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, प्रदेश कार्य.सदस्य प्रा.भानुदास बेरड, अॅड.अभय आगरकर, वसंत लोढा, सुनिल रामदासी, तुषार पोटे, महेश नामदे, शिवाजी दहिंडे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, किशोर डागवाले, रविंद्र बारस्कर, ज्ञानेश्वर काळे, गिता गिल्डा, मालनताई ढोणे, ज्योति दांगडे, प्रिया जानवे, रेखा मैड, लिला आगवाल, बाबासाहेब सानप आदि उपस्थित होते.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी म्हणाले, भाजपा हा शिस्तबद्ध पक्ष असल्याने विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वाखाली नियोजनपद्धतीने राज्यसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळविला आहे. केंद्र सरकारच्या विकास कामांवर जनता खूष असल्याने भाजप पक्षावर विश्वास वाढत आहे. आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे अनेक आमदारांच्या मतदार संघात कामे होत नसल्याने अनेकजण नाराज आहेत, हे आजच्या निकालावरुन दिसून येते, असे सांगितले.
याप्रसंगी प्रा.भानुदास बेरड, अॅड.अभय आगरकर, वसंत लोढा, बाबासाहेब वाकळे, किशोर डागवाले यांनीही या विजयाचे मनोगतातून स्वागत करुन पक्षाचे बळ असेच वाढत राहिल, असे सांगितले. शेवटी तुषार पोटे यांनी आभार मानले. यावेळी अशोक भोसले, धनंजय जामगांवकर, व्यंकटेश बोमादंडी, ओमप्रकाश तिवारी, महेश तवले, चंद्रकांत पाटोळे, राजू मंगलारम्, सुमित बटुळे, संजय ढोणे, वैभव झोटिंग, सतीश शिंदे, साखला, अभिषेक दायमा, महावीर कांकरिया आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी फटाक्यांचे अतिषबाजी करुन ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटण्यात आले. भारतीय जनता पार्टीचा विजय असो...च्या घोषणांनी परिसर दुमदुमन गेला होता.
Post a Comment