बालरंगभूमी परिषदेचे बालनाट्य शिबीर संपन्न.
अहमदनगर (प्रतिनिधी) भल्या भल्यांची जिथे भंबेरी उडते अश्या माऊली नाट्यगृहात आज बाल कलाकारांनी धम्माल उडवून दिली. बालरंगभूमी परिषद अहमदनगर जिल्हा शाखा आयोजित १० दिवसांचे बालनाट्य शिबीर ऊत्साहात संपन्न झाले. यात अभिनय , सूत्रसंचालन, एकपात्री, नाट्यछटा, नृत्य, बालनाटिका सादर झाल्या. ९० बालकलावंतांनी यात सहभाग नोंदविला.
या बालनाट्य शिबीरात १० दिवसात काय शिकायला मिळाले असे मुलांना विचारले असता , त्यांनी सांगितले मराठीचे सुस्पष्ट उच्चार, स्टेज डेरिंग आणि संयम, अभिनय या गोष्टी शिकायला मिळाल्या. एकीकडे मराठीकडे आपली तुतट चाललेली नाळ या शिबिरामुळे जुळत चाललीय अशी भावना पालकांनी व्यक्त केली.
शिबीराबाबत उल्लेखनीय बाब म्हणजे चार ते सात वर्षांच्या मुलांचे बालनाट्य "जादुची थैली', या बालनाट्याने रसिक प्रेक्षकांची मने जिकंली. सातबारीची गमंत, हसा चकट फू ही बालनाट्य देखील सादर झाली.
शिबीराचे संचालक सतीश लोटके म्हणाले, बालरंगभूमीची चळवळ वाढविणे , लहान वयातच नाट्यशास्राचे धडे मुलांनी गिरवले तर भावी नाट्यसृष्टीला मोठा हातभार लागेल. बाल कलावंतांसाठी वर्षेभराची बालरंगभूमीची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे असे श्री. लोटके यांनी सांगितले.
या बालनाट्य शिबीरात सतीश लोटके यांच्या सोबत मार्गदर्शक म्हणून देवीप्रसाद सोहोनी, सागर अलचेट्टी, शैलेश देशमुख , श्वेता मांडे, मोहिनीराज गटणे यांनी काम पाहिले.
बालनाट्य शिबीराचा सांगता समारोह बहुसंख्य प्रेक्षकांच्या व बालरंगभूमी परिषद,मुंबईचे प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, नाट्य परिषदेचे अध्यक्ष अमोल खोले, चित्रपट महामंडळाचे समन्वयक शशिकांत नजान, सेन्सॉर बोर्डाचे सदस्य स्वप्निल मुनोत, नियामक मंडळ सदस्य सतीश शिंगटे, संस्कार भारतीचे अध्यक्ष अँड. दीपक शर्मा, नगरसेवक धनंजय जाधव, डॉ. सत्रे, उद्दोजक विजय इंगळे, माऊली सभागृहाचे चेअरमन दिनकर घोडके, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ऊर्मिला लोटके यांच्या प्रमुख ऊपस्थितीत संपन्न झाला.यानिमित्ताने बाल राज्यनाट्य स्पर्धेतील विजेत्या कलावंतांचे सत्कार यावेळी करण्यात आले. बाल राज्यनाट्य स्पर्धेत अंतीम फेरीसाठी निवड झालेले आरती अकोलकर लिखित व दिग्दर्शित बालनाट्य "मी तुझ्या जागी असते तर" या बालनाट्यास सर्वांनी शुभेच्छा दिल्या. या शिबीराच्या यशस्वितेसाठी बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा उर्मिला लोटके, प्रसाद भणगे, टीना इंगळे, सुजाता पायमोडे, सुज्ञ टोणपे, मोहीत यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजसी भणगे, अदित्य जाधव, ओवी इंगळे, काव्या डौले, कृणालिका कर्नावट, समृध्दी येमुल, प्रत्यूष जोशी,रचना सत्रे, ईश्वरी वाळुंज यांनी केले.
स्वागत व प्रास्ताविक प्रसाद भणगे यांनी केले तर आभार प्रदर्शन टीना इंगळे यांनी केले.
Post a Comment