डॉ . विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात बाळासाहेब विखे यांची बाळासाहेब विखे यांची जयंती साजरी

डॉ. विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात बाळासाहेब विखे यांची बाळासाहेब विखे यांची जयंती साजरी               नगर- विळद घाट येथील डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली                    प्रारंभी स्वर्गीय बाळासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी फाऊंडेशनचे उपसंचालक श्री सुनील कल्हापुरे प्राचार्य डॉ उदय नाईक व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते यावेळी सर्वांनी बाळासाहेब विखे यांच्या कार्याची माहिती सांगितली प्रा निळकंठ देशपांडे यांनी केलेल्या भाषणांमध्ये बाळासाहेब विखे यांच्या कार्याचा आढावा घेतला बाळासाहेब उत्तुंग असे व्यक्तिमत्व होते समाजाला प्रेरणादायी असे काम त्यांनी केले त्यांचे जीवन दुसऱ्यांसाठी होते त्यांनी आपल्या आयुष्यात केलेल्या अखंड कर्मयोगाने ते अमर झालेले आहेत सर्व समाजाला त्यांच्या आठवण सदैव प्रेरणा देत राहील असे ते म्हणाले                                 फोटो ओळी- विळद घाट येथील डॉ विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात पद्मभूषण बाळासाहेब विखे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करताना फाऊंडेशनचे उपसंचालक प्रा सुनील कल्हापुरे प्राचार्य डॉ उदय नाईक सर्व विभागाचे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते(छाया-विजय मते)

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post