वयाच्या चौदाव्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवर गायले गाणं युवकांनी अर्जुन महानवर यांचा आदर्श घ्यावा :-प्रकाश भैय्या सोनसळे नेते धनगर समाज महाराष्ट्र राज्य


बीड( प्रतिनिधी) पुण्यश्लोक  आहिल्यादेवी होळकर साप्ताहिक परिवर्तन सभेच्या अभिवादन सभेच्या निमित्ताने आज बीडमध्ये पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून युवा गायक अर्जुन संतोष महानवर या युवकाने राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती या महिन्यांमध्ये होत असून या जयंती निमित्त युवागायक अर्जुन महानवर याने अहिल्यादेवी होळकर यांच्या आधारित गाणं तयार करुन ते गायले आहे. आपण जर हे गाणं ऐकले तर अंगावर शहारे आणणारे हे गाणं आहे.
    वयाच्या चौदाव्या वर्षी या युवा गायकाने हे गाणं तयार करून महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांच्या राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या आधारित हे गाणं तयार करून ते गायले असून युवागायक अर्जुन महानवर या मुलाचे राज्यभरातून कौतुक होत आहे कारण आज पर्यंत असे गाणं कोणी गायले नाही परंतु वय कमी असतानाही या मुलाने अहिल्यादेवी होळकर यांच्या आधारित गाणं गायले त्याबद्दल आज बीड येथे युवागायक अर्जुन संतोष महानवर त्याच्या या कामगिरी बद्दल माननीय प्रकाश भैय्या सोनसळे धनगर समाज महाराष्ट्र राज्य, सुंदररावजी काकडे मंडलाधिकारी, डॉ.संतोषजी महानवर, गीते सर, कुचेसर, प्रकाश देवकते ,करण भोंडवे, आदींनी अर्जुन संतोषराव महानवर यांचा सन्मान केला .व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या‌.
   अशीच प्रगती झाली पाहिजे व माँसाहेब पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्यावर भरपूर गाणे आपण तयार करावेत हीच आपणास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असे माननीय प्रकाश भैय्या सोनसळे यांनी सांगितले‌. हे संपूर्ण गाणं 15 मे रोजी पूर्ण होणार आहे‌‌.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post