अहमदनगर: संतोष जोशी यांची सहायक अधिक्षक डाकघर मुख्यालय अहमदनगर यापदी नियुक्ती झाली असून त्यानी 30 मे रोजी आपला पदभार स्वीकारला. हे पद मागील दोन वर्षांपासून रिक्त होते.
संतोष जोशी यांनी आपल्या डाकसेवेस अहमदनगर विभागातील पाथर्डी पोस्टऑफिस मधून डाक सहायक या पदापासून प्रारंभ केला त्यानंतर ते श्रीरामपुर विभागात अकोले येथे कार्यरत असताना ते खातेअंतर्गत परीक्षा उत्तीर्ण होत ते *इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट* यापदी त्याची निवड झाली व डाक निरीक्षक म्हणून खेड (पुणे) व कोपरगाव उपविभाग येथे काम पाहिले, यापदी कार्यरत असतानाच त्याची सेवाजेष्ठतेनुसार सहायक अधिक्षक डाकघर यापदी त्याची पदोन्नती झाली त्यानी यापदी जुन्नर (पुणे ) व श्रीरामपुर,संगमनेर उपविभाग येथे काम पाहिले. या उपविभागात कार्यरत असतानाच सन 2010-11 व 2011-2012 या आर्थिक वर्षात त्यानी पोस्टऑफिसच्या ग्रामीण जीवनविमा योजनेत उल्लेखनिय काम करत ते ऑल इंडिया टॉपर राहिले. आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवत एक कामगार प्रिय अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली. संगमनेर येथून त्याची बदली अहमदनगर मुख्यालय यापदी झाली आहे.
श्री संतोष जोशी यांनी आपला कार्यभार स्वीकारले बदल नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज चे राज्य उपाध्यक्ष व अहमदनगर विभागाचे जेष्ठ नेते श्री संतोष यादव यांनी त्याचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी त्याचे समवेत श्री संदीप कोकाटे,श्री नामदेव डेंगळे,श्री तान्हाजी सूर्यवंशी,श्री सुनिल थोरात,विजय दरदले, भाऊसाहेब जाधव,नितीन खेडकर,झुंबरराव विधाते,सागर पंचारिया,श्रीमती अर्चना भुजबळ, श्रीमती निलिमा कुलकर्णी,श्रीमती रंजना कडम यांचेसह मोठया संख्येने सभासद उपस्थित होते.
Post a Comment