श्रीरामपुर पोस्टल संस्था 36 वी वार्षिक सर्व साधारण सभा
श्रीरामपुर: श्रीरामपुर पोस्टल को ऑप क्रेडिट सोसायटीची 36वी वार्षिक सर्व साधारण सभा प्रधान डाकघर श्रीरामपुर येथे संस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजी चाफे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सभेच्या प्रारंभी अहवाल सालात दिवंगत झालेल्या सर्वाना श्रद्धांजली अर्पण केली.
त्यानंतर संस्थेच्या विधमान सचिव श्रीमती विजया शहाणे सभेची नोटीस पटलावर ठेवली सभेची नोटीस सह सर्व विषय एकमताने मंजूर करत संचालक मंडळाच्या कार्यभारावर विश्वास व्यक्त केला.
संस्थेचे सभासद श्री शशी पवार यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्यभाराविषयी समाधान व्यक्त करत संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
संस्थेचे जेष्ठ सभासद व पोस्टल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री संतोष यादव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,
या संस्थेची स्थापना 1987 साली झालेली असून महाराष्ट्रातील टपाल कर्मचाऱ्याची एक अग्रणी संस्था म्हणून या संस्थेचा नावलौकिक असून,जामीनदार मुक्त कर्ज उपलब्ध करून देणारी ,व कमीतकमी म्हणजे 8.25% व्याजदरात मध्ये कर्ज देणारी संस्था ही या संस्थेचे प्रमुख ओळख आहे. सातत्याने सभासदभिमुख निर्णय घेत ,ज्या बाबीत सभासद हित आहे त्यास प्राधान्य देण्याचा प्रयत्न संचालक मंडळाकडून होत असतो त्यामुळे हे संचालक मंडळ हे निश्चितच अभिनंदन पात्र आहे. यापुढील कालखंडात अश्याच सभासदभिमुख निर्णयाची अपेक्षा आपल्याकडून असेल. असे गौरवउदगार त्यानी व्यक्त केले.
सभेत सेवानिवृत्त ,गुणवंत पाल्याचा सत्कार श्री सागर आढाव पोस्टमास्तर श्रीरामपुर,श्री रामदास मोरे पोस्टमास्तर नाशिक रोड ,संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री संतोष यादव, श्री शिवाजी चाफे, श्री गोरख दहिवाळकर यांचे हस्ते करण्यात आला.
सभेस श्री नामदेव सुपे, बाळासाहेब थोरात, विनायक मोहन,वसंत नालकर,बबनराव शिंदे,ज्ञानेश्वर दौड, श्रीमती विमल पैठणकर,श्री रवीकुमार झावरे, नामदेव डेंगळे, संजय बोदर्डे,श्री कृष्णकांत शिरसाठ,श्रीमती शेहनाज तांबोळी,श्रीमती वर्षा दंडवते, श्रीमती अपूर्वा बेलसरे,श्री गोरख कांबळे,बापू निघूडे,अशोक कुलकर्णी, अशोक विधाते ,राजू अकबर शेख ,माधव पेहेरे,गफूर सय्यद,शैलेश शिलवंत,यांचे सह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
सभेचे प्रास्ताविक गोरख दहिवाळकर, सूत्रसंचालन राजेंद्र विश्वास तर आभार शैलेश जगताप यांनी केले.
Post a Comment