विखे अभियांत्रिकी व आर्मर्ड कॉर्प्स सेंटरचा सामंजस्याचा करार



      नगर     ( विजय मते)डॉ.विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची ख्याती फक्त ऐकून होतो पण प्रत्यक्षात येथे भेट दिल्यावर येथील शैक्षणिक प्रगतीने मन सुखावले. अद्यावत प्रयोगशाळा तज्ञ उच्च शिक्षण प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांबरोबरच, महाविद्यालयाविषयी असलेले काम कौतुकास्पद आहे. त्यामुळेच डॉ. विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्याल आणि आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अ‍ॅण्ड स्कूल यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे, असे प्रतिपादन कमांडंट ए आर.एस. केहलॉन यांनी केले.
     विळद घाट येथे डॉ.विखे पाटील महाविद्यालयात अभियांत्रिकीमध्ये टॅक टेक्नॉलॉजी हा कोर्स शिकविला जाणार आहे. एक वर्षाचा कालावधी असलेला या कोर्स बाबत समांजस्यचा करार करण्यात आला. यावेळी मेजर जनरल व्हीएसएम कमांडंट ए.आर.एस. केहलॉन, ब्रिगेडिअर रंजन केरॉन, कर्नल आय.जे.एस.मान, लेफ्टनंट कर्नल एस.के.मोहंती आणि डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे सेक्रेटरी जनरल डॉ.बी.सदानंदा, संचालक डॉ.पीएम.गायकवाड, उपसंचालक, सुनिल कल्हापुरे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय नाईक, यंत्र अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.किशोर काळे आदि उपस्थित होते.

     यावेळी डॉ.किशोर काळे यांनी या कोर्स संदर्भातील आव्हाने या कोर्सचे महत्व विषद केले. तसेच संशोधना संदर्भात आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अ‍ॅण्ड स्कूल, अहमदनगर सोबत एकत्रित येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

     डॉ.बी.सदानंदा यांनी मिलिटरीचे देशासाठी असलेल्या योगदानाबद्दल माहिती देवून टॅक टेक्नॉलॉजी कोर्ससाठी केलेला सामंजस्याचा करार म्हणजे देशसेवेची एक नामी संधी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनला दिल्याचे सांगितले.

     कमाडंट केहलॉन म्हणाले, हा कोर्स 49 टे्रनिंग कोर्स पुणे येथे पार पडले. हा 50 वा ट्रेनिंग कोर्स अहमदनगर येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पाडत असल्याचे सांगितले. अभियांत्रिकी महाविद्यालयात विभागात संपन्न उपकरणासह असलेल्या प्रयोगशाळांचे आणि तज्ञ उच्च शिक्षित प्राध्यापकांचे कौतुक करुन सर्व प्राध्यापक वृंद आणि डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या शिवाय आगामी काळात संशोधना संदर्भात आपण विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयासमोबत एकत्र येण्यास आपण उत्सक असल्याचेही सांगितले.

     आभार प्रा.डॉ.रविंद्र नवथर यांनी केले तर डेप्युटी डायरेक्टर प्रा.सुनिल कल्हापुरे व प्राचार्य डॉ.उदय पी.नाईक यांनी सामंजस्य कराराबाबत आयोजकांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

     संस्थेचे चेअरमन आ.राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.



     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post