अहमदनगर (प्रतिनिधी) :- जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना त्यांच्या कोरोना काळातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल रसिक ग्रुपच्या वतीने रसिक सामाजिक कृतज्ञता पुरस्कार पारस उद्योग समूहाचे चेअरमन, उद्योपती पेमराजजी बोथरा व संचालक संतोष बोथरा यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर यावेळी उपस्थित होते. शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गेल्या २ वर्षांच्या काळात कोरोना महामारी व लॉक डाऊनच्या संकट काळात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी माणुसकीच्या भावनेतून प्रशासकीय जबाबदारी योग्य रीतीने सांभाळली. कोरोना रुग्ण, त्यांचे नातेवाईक व बाहेर गावावरून पायी जाणाऱ्या लोकांना दिलासा देण्याचे काम केले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना रसिक सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रसिक ग्रुपने केलेल्या या सन्मानाबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आनंद व कृतज्ञता व्यक्त केले.
Post a Comment