वंचित बहुजन आघाडीतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी अभिवादन


     नगर - तुम्ही, जर शिकले तरच ताठ मानाने जगताल, तुम्ही, जर संघटीत होऊन आपल्यावरील अन्यायाला विरोध केला तर न्याय मिळेल, पण संघर्ष करतांना मात्र माणसाला माणुसकी मिळवून देण्यासाठी संघर्ष करा, असा संदेश डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. तो कृतीतून साकारण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे कायदेशीर सल्लागार अ‍ॅड.आनंद सूर्यवंशी यांनी केले.
     सावेडी उपनगरात गुलमोहोर रोडवरील पोलिस चौकीसमोर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची  जयंती वंचित बहुजन आघाडीतर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा महासचिव योगेश साठे,  विश्वभुषण गायकवाड, प्रमोद जगदाळे, सचिन दुशिंग, श्रीकृष्ण काळे, हंसनराजे शेख, बाळासाहेब उर्किडे, डॉ.अतुल चौरपगार, अभिजित मेढे, निलेश पाटोळे, अ‍ॅड.अतुल सरवदे, अ‍ॅड.महेश देठे आदि उपस्थित होते.
     यावेळी जिल्हा महासचिव योगेश साठे म्हणाले , माणसाच्या मुक्तीसाठी मन, मस्तक आणि मनगटाचा मिलाफ घडवून बिन चेहर्‍याचे आयुष्य जगत असलेल्या वंचितांना अस्मितेची ओळख मिळवून दिली. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा या संदेशाबरोबर समतेचे सत्य, प्रज्ञेचे पाईक आणि करुणेचा कलश म्हणजे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त ही विचारांची प्रेरणा आपण प्रत्यक्षात आचरणात आणण्याची गरज असल्याचे सांगितले.
     प्रारंभी बौद्धाचार्य दिपक पाटोळे यांनी वंदना म्हटली. यावेळी अशोक औटी, योगेश मेश्राम, प्रदीप ढगे, अजिंक्य आढाव, अशोक देवढे, अमोल पानसरे, मनेष कांबळे, शुभम जगदाळे, प्रमोद आढाव आदि उपस्थित होते.
 
---------
     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post