उर्दू प्रचार व प्रसाराबद्दल पत्रकार आबीद दुलेखान यांचा सन्मान




     नगर - आज उर्दू भाषेची होत असलेली उधोगती ही चिंताजनक आहे, अशा परिस्थितीत उर्दू भाषेचा प्रसार व प्रचार होण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. मखदूम सोसायटीच्या माध्यमातून विविध उपक्रमांद्वारे उर्दू भाषेच्या विकासासाठी सुरु असलेले प्रयत्न कौतुकास्पद असेच आहे. त्याच बरोबर कोरोना काळात गरजूंना मदतीचा हात देत संस्थेच्यावतीने केलेली मदत ही आधारभुत ठरली, या कार्यात आबीद दुलेखान यांनी दिलेले योगदान इतरांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते आफताब शेख यांनी केले.


     संगमनेर येथील एकता सेवा भावी संस्थेच्यावतीने उर्दूच्या प्रचार व प्रसारासाठी व कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आफताब शेख, जावेद शेख, राजुभाई इनामदार, तौसिफअली मनियार, एजाज बिल्डर, कलिम कादरी, पत्रकार शौकत पठाण, आसिफ शेख, आफताबभाई व नाईकवाडी मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


     सत्कारास उत्तर देतांना आबीद दुलेखान म्हणाले, दैनंदिन कामाबरोबर सामाजिक कार्यातही योगदान दिले पाहिजे, समाजातील गरजूंना मदतीचा हात देऊन त्यांनाही समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सोसायटीच्या माध्यमातून सुरु आहे. त्याचबरोबर उर्दू भाषेचा प्रचार व प्रसारासाठी संस्था विविध उपक्रम राबवत असते, त्यात आपणही सहभागी होऊन उर्दू भाषा सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे, असे आवाहन केले.


     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ शेख यांनी केले तर आभार राजूभाई इनामदार यांनी केले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post