नगर- शिवसेना उपनेते स्व.अनिलभैय्या राठोड यांच्या जयंतीनिमित्त शहर शिवसेनच्यावतीने दि.10 ते 12 मार्च 2022 दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिली. यावेळी आयोजित बैठकीस महापौर रोहिणी शेंडगे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, दिलीप सातपुते, ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, संजय शेंडगे, गणेश कवडे, बाळासाहेब बोराटे, सचिन जाधव, स्मिता अष्टेकर, अरुणा गोयल, सचिन शिंदे, शाम नळकांडे, मदन आढाव, दत्ता कावरे, योगीराज गाडे, हर्षवर्धन कोतकर, संग्राम कोतकर, दिपक खैरे, विजय पठारे, दत्ता जाधव, आकाश कातोरे, प्रशांत गायकवाड, काका शेळके, अंबादास शिंदे, कांता बोठे, पारुनाथ ढोकळे, दत्ता जाधव, सुरेश तिवारी, सुनिल लालबोंद्रे, रवी लालबोद्रे, अशोक दहिफळे, लंकेश हरबा, संतोष जाधव, अमित लढ्ढा, अण्णा घोलप आदि पदाधिकारी उपस्थित होते.
या तीन दिवशी कार्यक्रमाबाबत माहिती देतांना शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले, गुरुवार दि.10 मार्च रोजी केडगांव, भिंगार येथे शुक्रवार दि.11 रोजी सावेडी, बोल्हेगांव, नागापुर व शनिवार 12 मार्च रोजी मध्यनगर, माळीवाडा, चितळेरोड, रात्री 8 वा. नेता सुभाष चौक येथे हनुमान चालीसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीमध्ये शहरातील विविध भागात सर्वरोग निदान शिबीर, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, चारा वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, नेत्रतपासणी व चष्मे वाटप आदि कार्यक्रम होणार आहेत. तसेच दि.12 रोजी सकाळी स्व.अनिलभैय्या राठोड यांना अभिवादन करुन महाप्रसाद वाटपचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते होणार आहे
Post a Comment