.विखे पाटील अभियांत्रिकीत विधी प्राधिकरणाचे शिबीर संपन्न। महिलांनी सुरक्षित-निर्भयपणे जगण्यासाठी सोशलमिडियाचा योग्य वापर करावा - सौ.रेवती देशपांडे

नगर (विजय मते ) -आजची तरुण पिढी सोशल मिडियाच्या खूप आहारी गेली आहे. केवळ तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर समाधानी होऊ नका. महिलांना कायदेविषयी ज्ञान पाहिजे. त्या ज्ञानातून कायद्याचे फायदे कोणते होतात याची माहिती मिळते. महिलांनी सुरक्षितपणे, निर्भयपणे जगण्यासाठी सोशल मिडियाच्या जास्त आहारी न जाता त्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणच्या सेक्रेटरी सौ.रेवती देशपांडे यांनी केले.
विळद घाट येथे डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीत विद्यार्थींनीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राधिकरणाचे अॅयड.आर.आर.शिर्के, अॅेड.पुष्कर तांबोळी, संस्थेचे उपसंचालक प्रा.सुनिल कल्हापुरे, प्राचार्य डॉ.उदय नाईक, रुद्रनाथ प्रतिष्ठानच्या गायत्री कुलकर्णी उपस्थित होते.
सौ.देशपांडे यावेळी म्हणाल्या, महिलांना बर्याच वेळा कायद्याचे ज्ञान नसते ते माहिती होण्यासाठी आमच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना मोफत कायदेशीर सल्ला देण्याचे काम करतो. यामुळे एखादी घटना कोर्टापुढे नेण्यापूर्वी त्यावर योग्य प्रकारे कायदेशीर सल्ला दिला तर प्रकरणे निकाली लागतात, असे त्यांनी यावेळी सांगितले.
अॅ्ड.शिर्के यांनी मुलीच्या लग्नाचे वय 18 वरुन 21 करण्यात येणार असल्याने त्याचे फायदे काय होतील. याबाबत माहिती यावेळी दिली. अॅणड.तांबोळी यांनी विद्यार्थ्यांनी सॉफ्टवेअर बनवितांना सोशल मिडियाचा कसा वापर करावा याबाबत मार्गदर्शन केले. 
प्रा.कल्हापुरे यांनी महिला सशक्तीकरण व सबलीकरण या विषयावर मनोगत व्यक्त केले. रुद्रनाथ प्रतिष्ठानच्या गायत्री कुलकर्णी यांनी जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण यांनी महिलांसाठी राबवित असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. 
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभागप्रमुख डॉ.दीपक विधाते, माहिती व तंत्रज्ञान विभाग तसेच प्रा.ज्योती गायधनी,प्रा. श्रुती पोफळे माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी तसेच मुस्कान शेख, सई पाटील व क्षितीजा गायकवाड या विद्यार्थ्यांनीनी परिश्रम घेतले.
संस्थेचे चेअरमन राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य कार्य.अधिकारी खा.डॉ.सुजय विखे पा., सेक्रेटरी बी.सदानंदा व डायरेक्टर टेक्नि. पी.एन.गायकवाड, यांनी विद्यार्थींनीना व महिला विधी शिबिरास शुभेच्छा दिल्या.
--------

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post